- ऋजुता लुकतुके
भारतीय पुरुष संघ वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करत होता, तेव्हा महिला संघांमध्येही एक संघर्ष सुरू होता. चेन्नईत उभय देशांचे महिला संघ एकमेव कसोटी सामन्यात एकमेकांना भिडत होते. एका डावात ७ बाद ६०३ अशी विक्रमी धावसंख्या रचलेल्या भारतीय संघाला आफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात चांगलाच त्रास दिला. आणि शेवटी फॉलो ऑननंतरही भारताला दुसऱ्या डावात फलंदाजी करावी लागली. (Ind W bt SA W)
पण, अखेर विजयासाठी आवश्यक ३७ धावा भारतीय महिलांनी दहा गडी राखून पूर्ण केल्या. आणि मोठा विजय मिळवला. सलामीवीर शुभा सतीशने नाबाद १३ तर शेफाली वर्माने नाबाद २४ धावा केल्या. भारतीय महिलांनी कसोटीत १० गडी राखून मिळवलेला हा फक्त दुसरा विजय आहे. यापूर्वी २००२ मध्ये त्यांनी आफ्रिकन महिलांनाच पार्ल इथं या फरकाने हरवलं होतं. (Ind W bt SA W)
(हेही वाचा – India T20 Champion : आता विराट कोहलीनेही मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार)
या कसोटीत पहिल्या डावात भारतीय महिलांनी ७ बाद ६०३ अशी विशाल धावसंख्या रचली होती. महिला कसोटीतील ही एका डावातील सगळ्यात मोठी धावसंख्या ठरली. शिवाय भारतीय संघाने जेमतेम चार सत्रांत मिळून ही धावसंख्या गाठली. त्यामुळे सुरुवातीला आफ्रिकन संघ बॅकफूटवर गेला. त्यानंतर पहिल्या डावांत आफ्रिकन संघ २६६ धावांत गारद झाल्यामुळे भारताला ३३६ धावांची आघाडी मिळाली. (Ind W bt SA W)
यानंतर फॉलोऑन मिळालेल्या आफ्रिकन संघाने आपला दुसरा डाव सुरू केला आणि यावेळी चांगली लढत दिली. सुन लस (१०८) आणि वोलवार्ट (१२२) यांच्या शतकांमुळे आफ्रिकन संघाने तीनशे धावा सहज ओलांडल्या. दुसऱ्या डावात आफ्रिकन संघाने ३७३ धावा केल्या. खरंतर लस आणि वोलवार्ट खेळत असताना त्यांची अवस्था २ बाद २३२ अशी भक्कम होती. पण, त्यानंतर बळी जात राहिले. कापने ३१ तर डी कर्कने ६१ धावा केल्या. पण, इतर फलंदाज झटपट बाद झाले आणि आफ्रिकन संघ ३७३ धावांत गारद झाल्यामुळे भारतासमोर विजयासाठी ३७ धावांचं आव्हान उभं राहिलं. (Ind W bt SA W)
𝙏𝙝𝙖𝙩 𝙬𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙛𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜! 🤩
Captain @ImHarmanpreet receives the @IDFCFIRSTBank Trophy 🏆#TeamIndia win the #INDvSA Test by 10 wickets 💪
Scorecard ▶️ https://t.co/4EU1Kp7wJe pic.twitter.com/wXHDzn6ZSh
— BCCI Women (@BCCIWomen) July 1, 2024
(हेही वाचा – India T20 Champion : वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकलेला)
भारतातर्फे स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी दोन बळी मिळवले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक ३७ धावा भारताने दहाव्या षटकातच पूर्ण केल्या. पहिल्या डावातील द्विशतकवीर शेफाली वर्मा सामनावीर ठरली. या कसोटीत भारताने काही महत्त्वाचे विक्रम केले. पहिल्या दिवशी भारतीय महिलांनी ४ बाद ५२४ अशी धावसंख्या रचली होती. आणि महिला क्रिकेटमध्ये एका दिवसांत झालेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. (Ind W bt SA W)
तर ७ बाद ६०३ धावसंख्येवर कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतीय डाव घोषित केला. ही एका डावातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. शेफाली वर्माने केलेलं द्विशतक हे महिला क्रिकेटमधील सगळ्यात वेगवान द्विशतक ठरलं आहे. (Ind W bt SA W)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community