- ऋजुता लुकतुके
तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी भारतीय संघाला आधी १४७ धावांत रोखलं. आणि त्यानंतर हे माफक आव्हान ७ गडी राखून पार करत भारतीय महिलांचा आरामात पराभव केला. आणि मालिकाही २-१ अशी जिंकली. कसोटी मालिकेत भारतीय महिलांनी विजयम मिळवला. पण, त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारतीय महिला चारी मुंड्या चित झालेल्या दिसल्या.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने ३८ चेंडूत ५५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय महिलांसाठी मायदेशात स्वीकारलेला हा सलग चौथा मालिका पराभव ठरला. २०१९ पासून आधी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आता पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव पत्करावा लागला आहे.
#TeamIndia fought hard but it’s Australia who win the T20I series decider.
Scorecard ▶️ https://t.co/nsPC3lefeg#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5f0B2yHtZR
— BCCI Women (@BCCIWomen) January 9, 2024
(हेही वाचा – Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार ई-लिलाव)
पहिल्या दहा षटकांतच ऑस्ट्रेलियन महिलांनी १ बाद ८५ अशी मजल मारली होती. पण, त्यानंतर पूजा वस्त्राकार लागोपाठ चेंडूंवर तहलिया मॅग्रा आणि एलिसाला बाद करत सामन्यात थोडी रंगत निर्माण केली. पण, ती अल्पजीवी ठरली. फिबी लिचफिल्डने नाबाद १७ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय महिलांना सलग तिसऱ्या सामन्यात दीडशेचा टप्पाही गाठता आला नाही. खरंतर शेफाली वर्मा (Shefali Verma) (२६) आणि स्मृती मंढाना (Smriti Mandhana) (२९) यांनी भारतीय संघाला यावेळी अर्धशतकी सलामी करून दिली होती. पण, त्यानंतर दीप्ती शर्मा, (Deepti Sharma) जेमिमा रॉडरिग्ज (Jemima Rodrigues) झटपट बाद झाल्या. आणि ५४ धावांवर ४ गडी बाद झाले.
अखेर रिचा घोषने ३४ धावा करत भारतीय संघाला निदान दीडशेच्या जवळ आणलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community