ऋजुता लुकतुके
भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांदरम्यान झालेल्या टी-२० (Ind W vs Eng W T20) मालिकेत अखेर तिसऱ्या सामन्यात भारताने दिलासा देणारा विजय मिळवला. हा सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात पहिली गोलंदाजी करताना भारतीय महिलांनी इंग्लिश संघाला १२६ धावांतच रोखलं.
भारताकडून साईशा आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. या माफक आव्हानाचा सामना करताना सलामीवीर स्मृती मंढानाने ४८ धावा करत भारतीय डावाला आकार दिला. आणि शेवटी एक षटक बाकी असताना भारतीय विजय साकारला.
Celebrations in the camp after that close game 👌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/mk5p59yFrs
— BCCI Women (@BCCIWomen) December 10, 2023
खरंतर १२७ धावा हव्या असताना, भारतीय महिलांनाही बरेच कष्ट पडले. कारण, फलंदाजीची वेग काहीसा कमी होता. मंढानाने ४८ धावा केल्या त्या ४८ चेंडूंत. पण, त्यानंतर जेमिमा रॉडरिग्जचा (२६) अपवाद (Ind W vs Eng W T20) वगळता दीप्ती शर्मा, शेफाली शर्मा आणि रिचा घोष या एकेरी धावसंख्येतच बाद झाल्या. त्यामुळे भारतीय संघावरही दडपण वाढलं होतं. पण, अखेर अमनजोत कौरने आपल्या १० धावांच्या छोट्याशा खेळीत दोन चौकार लगावले. आणि भारताचा विजय सुकर केला. यातील रिव्हर्स स्वीपवर तिने मारलेला चौकार संघावरील दडपण कमी करणारा ठरला. विजयी चौकारही तिनेच लगावला.
Amanjot Kaur hits the winning runs 👏#TeamIndia win the 3rd and last T20I by 5 wickets 🥳
England win the series 2-1
Scorecard ▶️ https://t.co/k4PSsXN2T6 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yNlXmiKGu7
— BCCI Women (@BCCIWomen) December 10, 2023
भारतीय महिला संघाला मागच्या ५ सामन्यांतील पराभवानंतर हा पहिला विजय मिळवता आला आहे. तर इंग्लंड संघाविरुद्ध सप्टेंबर २०२२ नंतर भारतीय संघाने हा पहिला विजय मिळवला आहे. त्यातही ही मालिका आधीच जिंकल्यामुळे इंग्लिश महिला संघाने शेवटच्या टी-२० (Ind W vs Eng W T20) सामन्यात आपली दुसरी फळी उतरवली होती. ही मालिका भारतीय संघाने १-२ अशी गमावली आहे. आता दोन्ही संघ एकमेव कसोटी सामन्यात आमने सामने येणार आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community