ऋजुता लुकतुके
इंग्लंड आणि भारताचे महिला क्रिकेट संघ मुंबईत सध्या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना(Ind W vs Eng W Test) खेळतायत. आणि भारतीय महिलांनी पहिल्या दिवशी ७ गडी बाद ४१३ धावा केल्या तेव्हा एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवशी चारशेहून जास्त धावा होण्याची ही फक्त दुसरी वेळ आहे.
यापूर्वी १९३५ मध्ये ख्राईस्टचर्च इथं इंग्लिश महिला संघाने न्यूझीलंड विरुद्ध २ गडी बाद ४३० धावा केल्या होत्या. त्यानंतर ८८ वर्षांनी भारतीय संघाने या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. पहिल्या दिवशी भारताच्या दीप्ती शर्मा ६० तर पूजा वस्त्रकार ४ धावांवर खेळत होत्या.
𝗦𝘁𝘂𝗺𝗽𝘀!
Delightful day for #TeamIndia as the batters help reach 410/7 👌@Deepti_Sharma06 remains unbeaten on 60* 😎
Follow the match ▶️ https://t.co/UB89NFaqaJ#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/O3vpqJ7stA
— BCCI Women (@BCCIWomen) December 14, 2023
विशेष म्हणजे भारतीय संघाकडून एकही शतक झालं नाही तरीही संघाने चारशेचा टप्पा ओलांडला. शिवाय २०१४ नंतर भारतीय संघ पहिल्यांदा भारतात कसोटी खेळत आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत (Ind W vs Eng W Test) भारतीय फलंदाजी कमजोर ठरली होती. त्यामुळे या कसोटी सामन्यातही इंग्लिश संघाचं पारडं जड वाटत होतं. पण, कसोटीच्या पहिल्या दिवशी मात्र भारतीय आघाडीची फळी तसंच मधल्या फळीनेही मोलाचं योगदान दिलं.
शुभा सतिश (६९) आणि जेमिमा रॉडरिग्ज (६८) या दोघींनी ११५ धावांची भागिदारी करून भारतीय डावाला आकार दिला. तर हमरनप्रीत कौरचं अर्धशतक हुकलं असलं तरी तिनेही मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. तिचा धावचितचा बळी मात्र विचित्र आणि चर्चेचा विषय ठरला. २२ यार्ड पार करूनही बॅट वेळेवर खाली न टेकवल्यामुळे तिला हकनाक तंबूत परतावं लागलं.
Captain @ImHarmanpreet narrowly missed out on a half-century but that not before playing a handy knock 👍 👍
Follow the Match ▶️ https://t.co/UB89NFaqaJ #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nDLnDnJlFr
— BCCI Women (@BCCIWomen) December 14, 2023
तर यास्तिका भाटियाने दिवसाच्या शेवटच्या सत्रात ८८ चेंडूंत ६६ धावांची खेळी खेळल्यामुळे भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला. भारतीय संघाची एका डावातील आतापर्यंतची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. आणि संघाचे तीन गडी अजून खेळायचे बाकी आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community