Ind W vs Ire W, ODI Series : भारतीय महिलांचा आयर्लंडवर ३०४ धावांनी मोठा विजय, मालिकाही ३-० ने जिंकली

भारतीय महिला संघाने ५० षटकांत ४३५ धावांचा डोंगर उभा केला.

36
Ind W vs Ire W, ODI Series : भारतीय महिलांचा आयर्लंडवर ३०४ धावांनी मोठा विजय, मालिकाही ३-० ने जिंकली
Ind W vs Ire W, ODI Series : भारतीय महिलांचा आयर्लंडवर ३०४ धावांनी मोठा विजय, मालिकाही ३-० ने जिंकली
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा विजय भारतीय महिलांनी बुधवारी साकारला आहे. आर्यलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI Series) भारतीय महिलांनी ५ बाद ४३५ अशी उच्चांकी धावसंख्या रचली. त्यानंतर आयर्लंडला १३१ धावांत गुंडाळत ३०४ धावांनी विजय साकारला. कर्णधार स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) ८० चेंडूंतच १३४ धावा ठोकल्या तर प्रीत रावलनेही १५४ धावा केल्या. महिला क्रिकेटमधील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या ठरली आहे. तर हा विजयही सगळ्यात मोठा आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी सर्वोच्च धावसंख्या करून इतिहास रचला. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि प्रतिका रावल (Pratika Rawal) या सलामी जोडीच्या शतकांमुळे भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा जास्त धावांचा डोंगर रचला होता. यापूर्वी महिला क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ३७० होती, तीही याच मालिकेतील १२ जानेवारीच्या सामन्यात केली होती. मात्र, अंतिम सामन्यात आपलाच रेकॉर्ड मोडत महिला संघाने ५० षटकांत ४३५ धावांचा डोंगर रचला.

(हेही वाचा – Coastal Road चा शेवटचा टप्पा ‘या’ तारखेपासून सेवेत)

कर्णधार मंधानाने ८० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह १३५ धावा केल्या, तर प्रतिका रावलने (Pratika Rawal) १५४ धावा ठोकल्या, विशेष म्हणजे तिचा हा सहावा एकदिवसीय सामना आहे. या दोन्ही धडाकेबाज फलंदाजांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ४३५ धावांचा डोंगर उभारला. मात्र, भारताच्या ४३५ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या १३१ धावांवर तंबूत परतला. ३१.४ षटकांतच आयर्लंडचे सर्व फलंदाज बाद झाले. त्यामुळे, भारतीय संघाला ३०४ धावांनी मोठा विजय मिळाला. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील दमदार कामगिरीमुळे प्रतिका रावलला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, आजच्या सामन्यातील तडाखेबंद १५४ धावांसाठी तिला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. (Ind W vs Ire W, ODI Series)

(हेही वाचा – २ हजार ९४० Illegal Loudspeakers वर काय कारवाई केली ?; मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा)

या कामगिरीसह स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) एक अनोखा विक्रमही नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० शतकं ठोकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर आहे. तिने १५ शतकं ठोकली आहेत. तर सूझी बेट्सच्या नावावर १३ शतकं आहेत. हा विक्रम मोडण्याची संधीही मंढाणाला आगामी काळात आहे. आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत तिच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. तिने सातत्यपूर्ण कामगिरी करताना मालिकेत २४१ धावा ठोकल्या. तिची सरासरीही १२० धावांची आहे. भारतीय संघाला तिने ही मालिका ३-० ने जिंकून दिली. (Ind W vs Ire W, ODI Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.