- ऋजुता लुकतुके
भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेट संघ (Ind-W vs SA-W ) सध्या भारतात एकदिवसीय मालिका खेळत आहेत. बंगळुरू इथं घरच्या मैदानावर खेळताना भारतीय महिलांनी आपली फिरकीची ताकद आफ्रिकन महिलांना दाखवून दिली. पहिली फलंदाजी करताना स्मृती मंढाणाच्या शतकाच्या जोरावर भारतीय महिलांनी ८ बाद २६५ धावा केल्या. नंतर दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि आशा (Asha Sobhana) यांनी दक्षिण आफ्रिकेला १२२ धावांत रोखत १४३ धावांनी विजय मिळवला. (Ind-W vs SA-W )
(हेही वाचा- Devendra Fadnavis: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपा सज्ज, कार्यकर्त्यांना सल्ला देताना फडणवीस म्हणाले…)
थोड्याफार पावसामुळे बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावरील खेळपट्टी काहीशी संथ झाली होती. पण, स्मृतीने फलंदाजीवर त्याचा फारसा परिणाम होऊ दिला नाही. नेहमीच्या शैलीत खेळत आधी तिने जम बसवला. मग वेळ आल्यावर तिने फटकेबाजी करत धावाही वाढवल्या. १२७ चेंडूंत १ षटकार आणि १३ चौकारांसह तिने ११७ धावा केल्या. ४७ व्या षटकांत ती बाद झाली, तोपर्यंत तिने भारताला अडिचशे धावांच्या जवळ आणलं होतं. (Ind-W vs SA-W )
स्मृतीची खेळी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती. कारण, दुसऱ्या बाजूने आघाडीच्या फळीकडून तिला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. शेफाली शर्मा (Shefali Sharma) (७), दयालन हेमलता (Dayalan Hemalatha) (१२), हरमनप्रीत (Harmanpreet) (१०) आणि जेमिमा रॉडरिग्ज (Jemimah Rodrigues) १७ धावांवर बाद झाल्या. त्यामुळे भारताची अवस्था ५ बाद ९९ अशी झाली होती. पण, दीप्ती शर्माने (Deepti Sharma) ३७ आणि पूजा वस्त्राकारने ३१ धावा करत स्मृतीला साथ दिली. त्यामुळे भारतीय संघ २६५ धावा करू शकला. (Ind-W vs SA-W )
निसरड्या झालेल्या खेळपट्टीवर ही धावसंख्या मोठीच होती. दीप्ती शर्मा, आशा शोभना या फिरकीपटूंचा मारा सुरू झाल्यावर तर आफ्रिकन फलंदाज जाळ्यातच अडकले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुन लसने ३३ धावा करत थोडाफार प्रतिकार केला. मॅरिझेन कॅपने २४ धावा केल्या. बाकी फलंदाज फक्त हजेरी लावूनच परतले. (Ind-W vs SA-W )
(हेही वाचा- Kolkata येथील BJP Office बाहेर सापडली बॉम्बसदृश वस्तू; भाजप नेते म्हणतात, हे बंगालमध्येच का ?)
आशा शोभनाने (Asha Sobhana) ८.४ षटकांत २१ धावा देत ४ बळी मिळवले. तर दीप्ती शर्माने (Deepti Sharma) ६ षटकांत फक्त १० धावा देत २ बळी मिळवले. आपलं सहावं एकदिवसीय शतक झळकावणारी स्मृती मंढाणा सामनावीर ठरली. भारतीय महिलांनी आता आफ्रिकन संघावर मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. दुसरा एकदिवसीय सामना १९ जूनला बंगळुरूमध्येच होणार आहे. (Ind-W vs SA-W )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community