ऋजुता लुकतुके
भारतीय महिला सलामीवीर शेफाली वर्माने (Shafali Verma) शुक्रवारी महिला क्रिकेटमधील विक्रमांची यादी अनेक अर्थांनी नवीन लिहिली. चेन्नईत भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिकन महिला (Ind W vs SA W) संघामध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यांत शेफालीने फक्त १९४ चेंडूंत द्विशतक पूर्ण केलं. आणि महिला क्रिकेटमधील हे सगळ्यात वेगवान द्विशतक ठरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडने २४४ चेंडूंत द्विशतक पूर्ण केलं होतं. हा विक्रम शेफालीने लिलया मागे टाकला. (Ind W vs SA W)
(हेही वाचा- Ladakh Tank Accident : भारतीय सैन्याच्या रणगाड्यांना नदीत मोठा अपघात, ५ जवान हुतात्मा)
भारतीय महिला क्रिकेटसाठीही हे द्विशतक महत्त्वाचं ठरलं. मिताली राजनंतर कसोटीत द्विशतक ठोकणारी शेफाली फक्त दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीनंतर दुसरं द्विशतक २२ वर्षांनी झालं आहे. २० वर्षीय शेफाली (Shafali Verma) अर्थातच या कामगिरीनंतर खुश होती. ‘मी मनासारखे फटके खेळू शकले याचा मला आनंद आहे. हे द्विशतक माझ्यासाठी आयुष्यभर अनमोल ठेवा असेल,’ असं शेफाली म्हणाली. (Ind W vs SA W)
शेफाली (Shafali Verma) आणि स्मृती मंढाणा (Smriti Mandhana) यांनी सलामीच्या जोडीसाठी २५२ धावांची तगडी भागिदारी केली. मंढाणाही १४९ धावांवर बाद झाली. या दोघांच्या कामगिरीमुळे एका दिवसात भारतीय संघाने ५२५ धावा कुटल्या. महिला क्रिकेटमध्ये हा ही एक विक्रमच आहे. (Ind W vs SA W)
🚨 𝙍𝙀𝘾𝙊𝙍𝘿 𝘼𝙇𝙀𝙍𝙏 🚨
📽️ That 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗜𝗖 moment when #TeamIndia reached the highest-ever team total in Women’s Tests! 🔝👏
Follow the match ▶️ https://t.co/4EU1Kp6YTG#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nb9VxYhANf
— BCCI Women (@BCCIWomen) June 29, 2024
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने ६ बाद ६०३ वर आपला डाव घोषित केला आहे. महिलांच्या कसोटीतील हा उच्चांक आहे. (Ind W vs SA W)
‘१९ वर्षांखालील गटात भारताने टी-२० विजेतेपद पटकावलं त्या संघाचा मी भाग होते. तो विजय आणि त्यानंतर या द्विशतकाला माझ्या कारकीर्दीत महत्त्वाचं स्थान असेल. एकदिवसीय मालिकेत चांगली सुरुवात मिळूनही मी मोठी धावसंख्या रचू शकले नाही. तीच कसर भरून काढायची असं ठरवत मी कसोटी डावाला सुरुवात केली होती. आणि सगळं मनासारखं घडल्यावर फटकेही बॅटमधून आपोआप निघाले,’ असं सांगताना शेफालीच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. (Ind W vs SA W)
(हेही वाचा- T20 World Cup, Kapil on Bumrah : बुमराह माझ्यापेक्षा १००० पट चांगला, असं कपिल देव का म्हणतात?)
३ वर्षांपूर्वी शेफालीने (Shafali Verma) इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत ९६ धावा केल्या होत्या. नव्वदीत पोहोचल्यावर थोडं दडपण आल्याचं तेव्हाही तिने कबूल केलं होतं. आताही तिचा वेग त्या दरम्यान थोडा कमी झाला. पण, अखेर या मनोवस्थेवर मात करत तिने द्विशतकही पूर्ण केलं. (Ind W vs SA W)
शेफालीचा हा फक्त पाचवा कसोटी सामना होता. त्यात पहिलंच शतक तिने झळकावलं ते द्विशतकाच्या रुपात. चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या न रचण्याची तिची त्रुटी या सामन्यात तिने दूर केली. (Ind W vs SA W)
हेही पहा-