Ind Win T20 World Cup : ‘विश्वचषक हातातून निसटताना मी पाहिला, तोच मी सीमारेषेवर पकडला,’ – सूर्यकुमार यादव

Ind Win T20 World Cup : अंतिम फेरीच्या अंतिम षटकात सीमारेषेवर अद्भूत झेल पकडून सूर्यकुमारने भारताचा विजय निश्चित केला.

137
Ind Win T20 World Cup : ‘विश्वचषक हातातून निसटताना मी पाहिला, तोच मी सीमारेषेवर पकडला,’ - सूर्यकुमार यादव
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात शेवटच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. डावखुरा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड मिलर फलंदाजी करत होता. १६ व्या अक्षर पटेलच्या षटकाने सामन्याचं पारडं आधीच दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलं होतं. आता २७ चेंडूंत ५२ धावा करणारा क्लासेन मैदानात नसला तरी मिलर होताच. मिलरने पहिलाच चेंडू ठोकला तो ही सीमारेषेच्या पार. पण, तेव्हा अक्षरश: चमत्कार झाला. सूर्यकुमार यादवने चेंडू सीमारेषेच्या मागे पण, हवेत झेलला. पाय जमिनीला टेकण्यापूर्वी तो पुन्हा हवेत भिरकावला आणि मग सीमारेषेच्या आत येत तो पुन्हा पकडला. तरीही त्याचा तोल जातच होता. तो त्याने कसाबसा सावरला आणि मग भारतीय संघात जल्लोष झाला. असे झेल टी-२० क्रिकेटमध्ये तसे नवीन नाहीत. पण, तो प्रसंग अंतिम सामन्यात आणि तो ही मोक्याच्या क्षणी घडलेला होता. (Ind Win T20 World Cup)

सूर्याने हातातून निसटत असलेला सामना आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीने भारताला परत आणून दिला. सामना संपून ड्रेसिंग रुममध्ये परत जाताना काही पत्रकारांनी सूर्याला गाठलं आणि झेल नेमका कसा घेतलास हे विचारलं. सूर्याचं उत्तर साधं होतं. ‘तेव्हा डोक्यात काय चाललं होतं ते फारसं आठवत नाही. पण, विश्वचषक हातातून निसटताना मी पाहत होतो आणि म्हणून मी चेंडूवर महत्प्रयासाने ताबा मिळवला आणि विश्वचषक वाचवला. तेवढंच मला हवं होतं,’ असं सूर्यकुमार म्हणाला. (Ind Win T20 World Cup)

(हेही वाचा – Kedarnath blizzard : केदारनाथमध्ये हिमवादळ; बर्फ वितळून कोसळण्याची स्थिती! व्हिडीओ व्हायरल)

सूर्यकुमारच्या या झेलाची तुलना आता १९८३ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात कपिल देवने घेतलेल्या झेलाशी होत आहे. कपिल देवने पाठीमागे धावत जात घेतलेला तो झेल विवियन रिचर्ड्सचा होता आणि तिथून सामना भारताच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली होती. १९८३ च्या संघाचा भाग असलेले आणि सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले रॉजर बिन्नी अंतिम सामन्याच्या वेळी बार्बाडोसला होते. त्यांनाही कपिलच्या झेलाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. त्यांनीही सूर्यकुमारच झेल तितकाच महत्त्वाचा असल्याचा निर्वाळा दिला. (Ind Win T20 World Cup)

रोहित शर्मालाही अनेकांनी सूर्याच्या त्या झेलाबद्दल सांगितलं. ‘मी तेव्हा लाँग ऑनला उभा होतो. चेंडू सुर्याकडे जाताना मी पाहिलं. तेव्हाच मला वाटलं तो झेल टिपणार. मग त्याला सूर मारताना पाहिलं. पण, खरं सांगतो, तो झेल पकडणारच याची खात्री मला होती. दडपणाखालीही तो शांत असतो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला तरी मला निकाल आधीच माहीत होता. मी पुढच्या पाच चेंडूंची आणखी मनात सुरू केली होती,’ असं रोहित शर्मा म्हणाला. (Ind Win T20 World Cup)

या सगळ्यांपेक्षा भारी उत्तर भारताचे क्षेत्ररक्षाचे प्रशिक्षक टी दिलीप यांचं होतं. सूर्याने असे ५० झेल सरावादरम्यान पकडले होते. म्हणूनच अंतिम सामन्यात तो हा झेल टिपू शकला, असं ते म्हणाले. (Ind Win T20 World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.