PM Modi on Asian Games Medals : ‘देशात तुमच्यामुळे उत्सवी वातावरण’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडास्पर्धेत शंभर पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा सत्कार केला आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या.

118
PM Modi on Asian Games Medals : ‘देशात तुमच्यामुळे उत्सवी वातावरण’
PM Modi on Asian Games Medals : ‘देशात तुमच्यामुळे उत्सवी वातावरण’
  • ऋजुता लुकतुके

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडास्पर्धेत शंभर पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा सत्कार केला आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. होआंगझाओ इथं पार पडलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय पथकाने १०७ पदकांची मजल मारली. हा पल्ला भारतीय पथकाने पहिल्यांदाच गाठला. त्यामुळे पदक विजेते चीनमधून भारतात परतले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी (१० ऑक्टोबर) त्यांची आवर्जून भेट घेतली. (PM Modi on Asian Games Medals)

‘देशाच्या १४० कोटी जनतेच्या वतीने मी देशात तुमचं स्वागत करतो. तुम्ही घेतलेली मेहनत आणि तुमची पदकविजेती कामगिरी यामुळे देशात सध्या उत्सवी वातावरण पसरलं आहे,’ या शब्दात पंतप्रधानांनी खेळाडूंचं कौतुक केलं. (PM Modi on Asian Games Medals)

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याच्या दृष्टीने आपण योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

‘आशियाई खेळांमध्ये देशाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तुमचं यश हे देशाचं यश आहे. आणि म्हणून मला तुमचा अभिमान आहे. क्रीडा क्षेत्रात आपण योग्य दिशेनं पुढे जातोय असा विश्वास मला वाटतो,’ असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअमवर विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

अख्ख्या देशाला खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं पंतप्रधांनी यावेळी आवर्जून नमूद केलं आणि खेळाडूंच्या यशात त्यांचे कुटुंबींयं आणि प्रशिक्षकांचाही वाटा होता, असंही नमूद करायला ते विसरले नाहीत. आशियाई खेळातील कामगिरीनंतर मोदींनीच एका ट्विटरवरील संदेशात खेळाडूंचं सुयोग्य स्वागत करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता.

यंदाच्या १९व्या आशियाई खेळांमध्ये भारतीय पथकाने २८ सुवर्णांसह एकूण १०७ पदकं जिंकली. २०१८ च्या जकार्ता स्पर्धेदरम्यान जिंकलेल्या ७० पदकांचा विक्रम भारतीय पथकाने यावेळी मागे टाकला. पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण तुम्ही इथं ऐकू शकता. (PM Modi on Asian Games Medals)

(हेही वाचा – Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी क्रिकेट सज्ज)

आताच्या कामगिरीचं कौतुक करतानाच पंतप्रधानांनी पुढील यशासाठीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी केंद्रसरकारचा पाठिंबाही देऊ केला.

‘आता तुमच्या पुढे याहून जास्त मोठ्या कामगिरीचं उद्दिष्टं असायला हवं. आशियाई स्तरावर पदकांची संख्या आणखी वाढवणं आणि ऑलिम्पिक स्तरावरही अशीच भरीव कामगिरी करणं याला तुम्ही प्राथमिकता द्यायला हवी त्यासाठी सरकारकडून लागणारी मदत आणि सहकार्य नक्की तुम्हाला मिळेल,’ असं पंतप्रधान म्हणाले.

ॲथलेटिक्स, नेमबाजी आणि तिरंदाजीतल्या पदक संख्येचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. आणि या विजयामुळे आताच्या पदक विजेत्यांना तसंच नवीन खेळाडूंनाही पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रेरणा मिळेल, असं ते म्हणाले. पदक विजेत्या महिलांचा त्यांनी खास उल्लेख केला. (PM Modi on Asian Games Medals)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.