भारताने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या भारतासाठी बांगलादेशविरुद्धची मालिका खूप महत्त्वाची होती आणि बांगलादेशच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तब्बल १८८ रन्सनी विजय मिळवला आहे.
( हेही वाचा : मरिन ड्राईव्ह @१०७! मुंबईकरांच्या हक्काच्या जागेबद्दल काही रंजक गोष्टी… )
भारताची गुणतालिकेत झेप
या कसोटी सामन्यातील विजयामुळे भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये श्रीलंकेला मागे टाकले आहे आणि यामुळे भारताने चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. जागतिक कसोटी मालिका ही भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. चितगाव कसोटीमध्ये बांगलादेशचा पराभव करत भारताने जागतिक चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. यापूर्वी भारत चौथ्या स्थानी होता परंतु बांगलादेशला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता तिसऱ्या स्थानावर आली आहे. म्हणजेच आता भारतापुढे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका असे दोनचं संघ आहेत. आता ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताने ५५.३३ टक्के गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया आता ७५ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका ६० टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
पाकिस्तान बाहेर…
भारताने बांगलादेशचा पराभव केल्यावर पाकिस्तान संघ गुणतालिकेत अव्वल ५ मधून बाहेर पडला आहे. गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडनंतर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे.
Join Our WhatsApp CommunityBig change at the top of the World Test Championship standings following India's victory over Bangladesh 👀#BANvIND | #WTC23
Details 👇https://t.co/r9cCcerb6X
— ICC (@ICC) December 18, 2022