भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ९९ धावांमध्ये आटपला यावेळी कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. ९९ धावांचा पाठलाग करताना भारताने सुद्धा दमदार फलंदाजी करत हा सामना ७ विकेट्स राखत जिंकला. भारताने या विजयासह आता वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे. १९ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने एका वर्षात ३७ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. भारताने या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
( हेही वाचा : मीरा भाईंदरला ‘मॉडेल शहर’ बनविणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा )
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
भारताचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकसा बाद करून आफ्रिकेला पहिला धक्का मिळाला. त्यानंतर एका पाठोपाठ आफ्रिकेचे सर्व फलंदाज बाद झाले.
कुलदीप यादवने घेतल्या सर्वाधिक विकेट्स
कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या असून त्याने ४.१ षटकात १८ धावा दिल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज नदिमने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात भारताने विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिकाही जिंकली आहे.
Join Our WhatsApp Community