-
ऋजुता लुकतुके
अहमदाबाद आणि गांधीनगर या दोन गुजरातमधील गावांत मिळून २०३६ चं ऑलिम्पिक व्हावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून आंतरराष्ट्रीय समितीला तसा सुरुवातीचा अर्जही गेला आहे. आता हे ऑलिम्पिक भरवायचं झाल्यास भारताला काय काय तयारी करावी लागेल याचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं आहे. अशाच एका बैठकीत ऑलिम्पिक आयोजनाचा खर्च काढण्यात आला. तो तब्बल ३४ ते ६५ हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. ऑलिम्पिक दावेदारीसाठी नेमलेल्या समन्वय समितीने आपल्या आढावा बैठकीत हा अर्थसंकल्प सादर केला आहे. (India Bids For Olympics)
(हेही वाचा – ICC Panel of Umpires : आयसीसीच्या पंचांच्या पॅनलमध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय पंच)
गांधीनगरमध्ये ही आढावा बैठक या आठवड्यात झाली आणि तिथे ऑलिम्पिक आयोजन कशाप्रकारे केलं जाऊ शकतं याचं एक सादरीकरणही करण्यात आलं. ‘अमदावाद २०३६’ असं या सादरीकरणाचं नाव होतं. अहमदाबाद आणि गांधीनगरबरोबरच भोपाळ, गोवा, मुंबई आणि पुणे या चार शहरांमध्ये आयोजन करायचं झाल्यास किंवा काही स्पर्धा तिथे भरवायच्या झाल्यास किती खर्च येईल याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. (India Bids For Olympics)
(हेही वाचा – Kunal Kamra ला वाढीव मुदत देण्यास पोलिसांचा नकार; बजावले दुसरे समन्स)
या आधी झालेल्या ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी झालेला खर्च या सादरीकरणात गृहित धरण्यात आला आहे. पण, तो पाहता प्रस्तावित खर्च हा नुकत्या पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकपेक्षा काही पटींनी जास्त आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ९.१ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च आला होता. भारताने २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनाचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे पाठवला आहे. यासाठी भारताची स्पर्धा इंडोनेशिया, टर्की, चिली, या देशांशी प्रामुख्याने होणार आहे. याशिवाय इजिप्त, इटली, डेन्मार्क आणि कॅनडा हे देशही आयोजनासाठी उत्सुक आहेत. सध्या २०२८ चं ऑलिम्पिक अमेरिकेत लॉस एंजलिस आणि २०३२ चं ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं होणार आहे. (India Bids For Olympics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community