India vs England 2022: भारतीय संघाचा कर्णधार कोरोनाच्या विळख्यात!

95

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला आणि एकमेव कसोटी सामना येत्या १ जुलै रोजी नियोजित आहे. मात्र त्या आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्याच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या संदर्भात बीसीसीआयने ट्वीट करत याची माहिती दिली. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा – बंडखोरांमध्येच बंडखोरी होणार! हिंमत असेल तर…, राऊतांनी दिलं चॅलेंज)

बीबीसीसीआयने दिली माहिती

बीबीसीसीआयने ट्वीट करत म्हटले आहे की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रोहित टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रोहितची आरटी-पीसीआर टेस्टही केली जाईल. रोहितचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर भारतीय संघासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, कारण रोहित १ जुलैपासून होणाऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. त्याला कोरोनातून बरं होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल. असे झाल्यास रोहित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला कर्णधार बनवले जाऊ शकते.

या दोन्ही खेळाडूंची कोरोनावर मात

दरम्यान, भारतीय संघ १६ जूनला इंग्लंडला रवाना झाला. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे टीमसोबत इंग्लंडला गेला नाही. तसेच गेल्या आठवड्यात लंडनला पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र सध्या हे दोन्ही खेळाडू आता बरे झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.