Asian Games 2023 : भारताची यशस्वी आगेकूच; देशाला मिळाले सहावे सुवर्ण पदक

137
Asian Games 2023 : भारताची यशस्वी आगेकूच; देशाला मिळाले सहावे सुवर्ण पदक

चीनच्या हांगझू या शहरात यावर्षीची म्हणजेच १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसच्या पुरुष संघाने विजयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर आता भारताने या स्पर्धेतील सहावे सुवर्ण पदक जिंकून पदकांच्या यादीत भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

आज म्हणजेच गुरुवार २८ सप्टेंबर रोजी भारतीय पुरुष (Asian Games 2023) संघाने १० मीटर एअर पिस्तुलमध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले. सरबजीत सिंग, अर्जुन सिंग आणि शिवा नरवाल यांनी मिळून या स्पर्धेत १७३४ स्कोअर करत सुवर्णपदक पटकावले.

(हेही वाचा – Asian Games 2023 : एमबीबीएस अभ्यासक्रम सोडून ती नेमबाजीत आली, सिफ्त कौरचा सुवर्ण जिंकण्यापर्यंतचा प्रवास)

याआधी भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवीने ६० किलो वजनी (Asian Games 2023) गटात रौप्यपदक जिंकले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने आतापर्यंत २३ पदके जिंकली आहेत. त्यापैकी ५ सुवर्ण आहेत. यापैकी ३ जणांनी नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले आहे. तर घोडेस्वारी स्पर्धेत एक सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर महिला क्रिकेट संघानेही सुवर्णपदक पटकावले आहे. याशिवाय भारताला ७ रौप्यपदक मिळाले आहेत. यामध्ये ४ नेमबाजी, २ रोइंग आणि 1 सेलिंगचा समावेश आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी (Asian Games 2023) १० कांस्यपदके जिंकली आहेत. ज्यामध्ये ३ कांस्य पदके रोईंगमध्ये आणि ६ नेमबाजीत, तर २ सेलिंगमध्ये आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.