India in Final : एरवी फलंदाजांनी गाजवलेल्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शामीच्या गोलंदाजीचा डंका

तेज गोलंदाज मोहम्मद शामीला या विश्वचषकात खेळण्याची संधी उशिरा मिळाली. पण, त्यानंतर त्याने धुमाकूळ घातला आहे.

88
India in Final : एरवी फलंदाजांनी गाजवलेल्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शामीच्या गोलंदाजीचा डंका
India in Final : एरवी फलंदाजांनी गाजवलेल्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शामीच्या गोलंदाजीचा डंका
  • ऋजुता लुकतुके

तेज गोलंदाज मोहम्मद शामीला या विश्वचषकात खेळण्याची संधी उशिरा मिळाली. पण, त्यानंतर त्याने धुमाकूळ घातला आहे. (India in Final)

या विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने भल्या भल्यांची दांडी गुल करणारा मोहम्मद शामीने न्यूझीलंड विरुद्धचा उपांत्य सामनाही गाजवला आणि या सामन्यात तर त्याने ५७ सामन्यांत ७ बळी मिळवले. त्याची ही कामगिरी भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली आहे. (India in Final)

विश्वचषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी आशीष नेहराने २००३ च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध २३ धावांत ६ बळी टिपले होते. याशिवाय शामीची ही कामगिरी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील पाचवी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. (India in Final)

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्राने नामिबिया विरुद्ध १५ धावांत ७ बळी मिळवले होते. (India in Final)

याशिवाय विश्वचषक स्पर्धेत ५० बळींचा टप्पा शामीने पूर्ण केला आहे तो वेगवान वेळेत. अवघ्या सतराव्या सामन्यात शमीने हा टप्पा पूर्ण करताना मिचेल स्टार्कला मागे टाकलं आहे. (India in Final)

(हेही वाचा – Virat Kohli 50th Century : विराटच्या शतकानंतर पत्नी अनुष्का शर्माची अशी होती प्रतिक्रिया, व्हीडिओ व्हायरल)

१७ विश्वचषक सामन्यांत ५४ बळी मिळवताना शामीने १२.९० ची सरासरी राखली आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट आहे १५.३३ म्हणजेच १५ धावा दिल्यावर तो एक बळी मिळवतो. विश्वचषक सामन्यांत सर्वाधिक बळी ग्लेन मॅग्राच्या नावावर आहेत. ३९ सामन्यांत मॅग्राने ७१ बळी मिळवले आहेत. पण, विश्वचषकात सर्वाधिक वेळा ५ बळी मिळवण्याची कामगिरी शामीने केली आहे. एकूण ४ वेळा शामीने निम्मा संघ गारद करण्याची किमया केली आहे. (India in Final)

आताच्या विश्वचषकात शामीला संधी मिळाली ती भारताचे दोन सामने झाल्यानंतर, हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शामी संघात आला. पण, त्यानंतर खेळलेल्या ६ सामन्यांत त्याने २३ बळी मिळवले आहेत आणि ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झंपाला मागे टाकून आता तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. (India in Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.