Ind vs Afg 3rd T20 : भारताला हवाय टी-२० मालिकेचा परिपूर्ण शेवट

अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या २ टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतर भारताला आता मालिकेचा शेवटही विजयाने करायचा आहे

202
Ind vs Afg 3rd T20 : भारताला हवाय टी-२० मालिकेचा परिपूर्ण शेवट

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने आक्रमक बाणा दाखवून दिला आहे. फलंदाजांनी कुठलीही किंमत देऊन वेगवान धावा जमवण्याचा प्रयत्न केलाय. तर गोलंदाजांनी बळी मिळवण्यासाठीच गोलंदाजी केलीय. असा कमालीचा आक्रमक पवित्रा घेतलेला भारतीय संघ आता अफगाणिस्तानवर मालिकेत एक शेवटचा वार करण्याचा प्रयत्न करणार आहे. (Ind vs Afg 3rd T20)

टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी हा शेवटाचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आणि मध्ये आयपीएल असली तरीही खेळाडूंचं लक्ष या सामन्यावर असणारच. नवीन खेळाडूंना संधी आणि आक्रमक रणनीती यामुळे दुसऱ्या सामन्यात भारताने शुभमन गिललाही बसवलं आणि यशस्वी जयसवालला संधी दिली. तर आधीच निवड समितीने श्रेयस, राहुल यासारख्या अनुभवी खेळाडूंऐवजी शिवम दुबे, जितेन शर्मा, तिलक वर्मा यांची निवड केलीय. विशेष म्हणजे हे नवीन आणि युवा खेळाडू आपल्या कामगिरीने निवड सार्थ ठरवतायत. पण, टी-२० विश्वचषकासाठी संघातील चुरस न संपणारी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला एक शेवटचा धक्का देताना भारतीय खेळाडूंना निवड समितीसमोर आपली सर्वोत्तम कामगिरी पेश करायची आहे. त्याचं मुख्य उद्दिष्ट आता तेच आहे. (Ind vs Afg 3rd T20)

पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाने विजयाचं लक्ष्य १७व्या आणि १६ व्या षटकातच पार केलं. आता कदाचित पहिली फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारायचं भारतीय संघाच्या मनात असेल.रोहितला पहिल्या दोन सामन्यात भोपळा फोडता आला नसला तरी ती कसर तिसऱ्या सामन्यात भरून काढण्यासाठी तो नक्की उत्सुक असेल. तर यशस्वी, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि जितेन शर्मा यांची फलंदाजी जमून आली आहे. आता तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ फलंदाजीत काही बदल करतो का ते पहावं लागेल. कदाचित जितेनच्या ऐवजी संजू सॅमसनला संधी मिळू शकते.

(हेही वाचा : CET Exam: सीईट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 18 परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार; वाचा सविस्तर)

गोलंदाजीतही कुलदीप यादव आणि आवेश खानला संघात स्थान मिळू शकतं. त्यासाठी रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना बाहेर बसावं लागू शकतं. बंगळुरूचं चिन्नास्वामी मैदान लहान सीमारेषेचं त्यामुळे मोठ्या धावसंख्येचं असेल हे नक्की. आणि अशा खेळपट्टीवर अफगाण फलंदाजांनाही समसमान संधी आहे. महम्मद नाबी आणि गुरबाझ यांच्याकडून संघाला अपेक्षा असतील. तर गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी धावा लुटल्या नाहीत आणि कामगिरीत सातत्य ठेवलं तर अफगाण संघालाही भारतासमोर आव्हान उभं करता येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.