टी-२० विश्वचषकातून भारत स्पर्धेबाहेर; रोहित शर्माच्या एका चुकीमुळे गेमचेंज, ट्वीटरवरही रंगली चर्चा

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताला विरुद्ध संघाची एकही विकेट काढता आली नाही. रोहित शर्माकडून यावेळी एक मोठी चूक झाली आणि त्याचा संपूर्ण फटका भारताला बसल्याचे पहायला मिळाले.

( हेही वाचा : Government Employees : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या ‘या’ आहेत प्रमुख मागण्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा)

भारत विश्वचषक स्पर्धेबाहेर 

भारताने विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्या जोरावर १६८ धावा केल्या होत्या परंतु भारताला ही धावसंख्या डिफेंड करता आली नाही. सुरूवातील भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी गोलंदाजी केली पण यानंतर रोहितने लगेच फिरकी गोलंदाजांना संधी दिली आणि हिच रोहितची सर्वात मोठी चूक असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. यावेळी फिरकी गोलंदाजांऐवजी रोहित शर्माने मोहम्मद शमीला संधी दिली असती तर आता चित्र वेगळे असते. यामुळे भारताचे या विश्वचषकातील आव्हान संपले आहे. अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी शतकी भागिदारी केली आणि इंग्लंडचा विजय झाला.

दरम्यान, भारताने इंग्लंडला १६९ धावांचे आव्हान दिले होते, यावेळी विराट कोहलीने ५० तर हार्दिक पंड्यांने ६३ धावा केल्या. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. विराटने १३८.१५ च्या स्ट्राईक रेटने ४००० धावा केल्या आहेत. ट्वीटरवर रोहित शर्माच्या कॅप्टनसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here