भारत-पाकिस्तान क्रिकेट संघाचा सामना हा दोन्ही देशांसाठी एकप्रकारे युद्धासारखाच असतो, सामन्याच्या वेळी दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये एकप्रकारे तशी भावना जागृत होत असते. हाच अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमी नागरिकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. कारण २४ ऑटोबर रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील क्रिकेट संघाचा टी-२० सामना खेळवला जाणार आहे.
२०१९ पासून भारत-पाक सामना झालाच नाही!
आयसीसीने यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्यासामान्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा यावर्षी होणार होती. मात्र कोरोनामुळे आता या स्पर्धेहे आयोजन ओमान आणि यूरोपमध्ये करण्यात आले आहे. आयसीसी टी – २० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही लीग सुरू झाल्यानंतर काही दिवसात भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ एकमेकांसमोर येणार आहेत. हे सामने दुबई, अबूधाबी, शारजाह आणि ओमान येथील स्टेडियममध्ये होणार आहेत. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानशी असून हा सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईत रंगणार आहे. विविध कारणांमुळे भारत-पाकिस्तानमध्ये २०१९पासून द्विपक्षीय सामने खेळवले गेले नाही. पण आता टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे भारत-पाकिस्तानमधील चाहत्यांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने असणार आहेत. आयसीसीने केलेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या ग्रुपच्या घोषणेनुसार, दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.
Isa Guha, Daren Sammy and Dinesh Karthik will have all the news you need to know at 9am Dubai time today (+4 GMT) 👇#T20WorldCup https://t.co/eEepPPpvZd
— ICC (@ICC) August 17, 2021
(हेही वाचा : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेची तयारी! अफगाण नागरिकांचीही काळजी!)
अशी आहे संघ वर्गवारी!
ग्रुप ‘ए’ मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे. तर ग्रुप ‘बी’ मध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमान या टीम आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकी सर्वोच्च दोन-दोन संघ वर्ल्ड कपसाठी निवडले जातील. सुपर १२चे सामने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. याआधी १७ ऑक्टोबरपासून पहिल्या राउंडचे सामने खेळवले जातील. सुपर १२च्या ग्रुप १ मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिकेसह पहिल्या राउंडच्या ग्रुप ‘ए’ मधील विजेता संघ आणि ग्रुप ‘बी’चा रनर अप संघ असेल. तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसह पहिल्या राउंडमधील ग्रुप बीचा विजेता संघ आणि ग्रुप ‘ए’ ची रनर अप टीम असेल.
Join Our WhatsApp Community