India- Pakistan Match : रद्द झालेला भारत पाकिस्तान सामना लवकरच होणार..

कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर ११ आशिया चषक २०२३ सुपर-४ सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 

172
India- Pakistan Match : रद्द झालेला भारत पाकिस्तान सामना लवकरच होणार..
India- Pakistan Match : रद्द झालेला भारत पाकिस्तान सामना लवकरच होणार..

पावसामुळे रद्द झालेला भारत पाकिस्तान सामना (India- Pakistan Match) १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.कोलंबो येथील पावसामुळे एशियन क्रिकेट काउंसीलने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत खेळला झात असलेला आशिया कप पावसामुळ चर्चेत आहेत. पावसामुळे आशिया कप मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती, यादरम्यान या सामन्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) म्हटले आहे की, १० सप्टेंबर २०२३ रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर ११ आशिया चषक २०२३ सुपर-४ सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

तर तिकिट दुसऱ्या दिवशीही वैध राहील
प्रतिकूल हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना, ११ सप्टेंबर २०२३ रोजी तो स्थगित केल्यापासून सुरू राहील. अशा परिस्थितीत, सामन्याची तिकीटे विकत घेतलेल्यांना ही तिकिटे सांभाळून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सामन्याची ही तिकटे दुसऱ्या दिवशी देखील वैध राहतील, असेही सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा : Ganesh Agaman : आता प्रतीक्षा गणेशोत्सवाची !)

लागोपाठ खेळावे लागतील दोन सामने
जर १० तारखेला होणारा हा सामना पूर्ण झाला नाही तर हा सामना ११ सप्टेंबरला पूर्ण केला जाईल. या परिस्थितीत भारतीय संघाला दोन सामने लागोपाठ खेळावे लागणार आहेत. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भारताचे १२ सप्टेंबरला बांग्लादेशविरोधात सामना आहे. सुपर चार मध्ये फाक्त भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठीच रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इतर कोणताही सामना पावसात वाहून गेला तर तो रद्द करण्यात येईल. भारत-पाक सामन्याव्यतिरिक्त फक्त आशिया कपच्या फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.