अखेर भारत-पाक क्रिकेट युद्ध होणारच!

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, 'भारत-पाकिस्तान सामना रद्द करता येणार नाही. कारण आयसीसीआयसोबत झालेल्या वाचनबद्धतेमुळे सामना न खेळण्याचा निर्णय घेता येऊ शकत नाही', असे म्हटले आहे.

121

भारताच्या सीमेवर पाकिस्तानी घुसखोरांनी हैदोस घातला आहे. त्यांच्याशी चकमक करताना ९ भारतीय सैन्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत – पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी – २० क्रिकेट सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी देशभरातून होऊ लागली आहे. मात्र अखेर हा सामना होणार अशी चिन्हे दिसत आहेत. कारण बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, ‘भारत-पाकिस्तान सामना रद्द करता येणार नाही. कारण आयसीसीसोबत झालेल्या वचनबद्धतेमुळे सामना न खेळण्याचा निर्णय घेता येऊ शकत नाही’, असे म्हटले आहे.

सामन्याला का  होतोय विरोध? 

मागील २ आठवड्यांपासून भारत – पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. या ठिकाणी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी धुडगूस घातला आहे. या ठिकाणी घुसखोरांवर आळा बसवण्यासाठी भारतीय सैन्याला दहशतवाद्यांशी दोन हात करावे लागले. त्यामध्ये आतापर्यंत ९ भारतीय जवानांना वीर मरण आले आहे. एका बाजूला भारतीय सैन्य सीमेवर लढत असताना दुसरीकडे पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळून मनोरंजन का करायचे, असा प्रश्न विचारला जात आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी ‘पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे मूर्खपणाचे आहे. पाकिस्तानसोबत होणाऱ्या टी – २० सामन्याला आम्ही विरोध करतो’, असे म्हटले आहे.

https://twitter.com/TeamPushpendra/status/1450008534515519490?s=20

तर एमआयमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही याला विरोध केला आहे. त्यांनी म्हटले  की, ‘पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैन्यांना वीर मरण आले आहे आणि पंतप्रधान मोदी पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळत आहेत, हे चुकीचे आहे.’

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होऊ नये, असे माझे आणि रिपब्लिकन पक्षाचे मत आहे. पाकिस्तानबरोबर खेळू नये, याबाबत गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी जय शहा यांना सांगेन. खेळामध्ये राजकारण आणू नये हे खरे आहे, पण अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, असे रिपाईचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

(हेही वाचा : ट्विटरचा आता बांगलादेशातही हिंदुद्वेष!)

सामन्याची तयारी सुरु! 

दरम्यान या विरोधावर बीसीसीआयने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे या सामन्याची तयारीही सुरु झाली आहे. भारताचा संघ असलेल्या सुपर १२ गटाचे सामने २३ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्याआधी सुपर १२ मधील संघ सराव सामने खेळत आहेत. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी २४ ऑक्टोबर रोजी असून दोघांनी सराव सामन्यात तगडा विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला ७ विकेट्सने तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला ७ विकेट्सने पराभूत केले आहे. वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाला पराभूत करणाऱ्या पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जबरदस्त रणनीती बनवण्यास सुरुवात केली असून समोर येणाऱ्या माहितीनुसार संघात अष्टपैलू खेळाडू मिळून तब्बल ७ गोलंदाज असणार आहेत. यामध्ये ३ मुख्य गोलंदाज तर ४ अष्टपैलू खेळाडू असतील.

पाकिस्तानी संघ – बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.

भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.