बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भारत आणि पाकिस्तान सामना हा येत्या १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाणार होता. मात्र आता हा सामना त्याच्या नियोजित दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदाचा विश्वचषक हा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. या विश्वचषकातील भारत पाकिस्तानचा पहिला सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र त्याच दिवशी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा सामना एक दिवस आधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा एजन्सीने सामन्याची तारीख बदलण्याची मागणी केली आहे.
अशातच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी उद्या म्हणजेच गुरुवार, २७ जुलै रोजी विश्वचषक स्पर्धा ठिकाणाच्या राज्य संघटनांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सामन्याची नवी तारीख किंवा ठिकाण बदलण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना एक महिन्यात खाली करायला लावला बंगला)
ऑक्टोबर १५ रोजी होणार इंग्लड अफगाणिस्तानाचा सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एक दिवस आधी झाला तर १५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये सामना खेळवला जाऊ शकतो. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सध्या १४ ऑक्टोबर रोजी २ सामने होणार आहेत. न्यूझीलंड-बांगलादेश या संघांमधील पहिला सामना बेंगळुरू येथे तर, दुसरा सामना इंग्लंड-अफगाणिस्तान या संघांत दिल्ली येथे होणार आहे. उर्वरित सामन्यांच्या वेळेत आणि ठिकाणामध्ये कोणताही बदल होणार नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community