-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंशी फोनवरून संवाद साधत त्याचं अभिनंदन केलं. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्यानंतर ट्विटरवरून पंतप्रधानांचे त्यासाठी आभारही मानले होते. आता विराटनेही (Virat Kohli) ट्विटरवर मोदींच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांच्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत. (India T20 Champion)
भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोस इथं दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद (India T20 Champion) पटकावलं. त्यानंतर मोदींनी रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुल द्रविड यांना उद्देशून खास ट्विट केलं होतं. विराटने (Virat Kohli) या ट्विटला उत्तर देताना विराटनेही पंतप्रधानांचे आभार मानले.
(हेही वाचा – Thane येथील हजुरी भागात मुसलमानांनी मंदिरात घुसून माजवली दहशत; महिलेला धमकावले)
‘तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. तुमचं प्रोत्साहन आणि पाठिंबा आम्हाला नेहमीच मिळाला आहे. विश्वचषकाचा करंडक घरी आणणाऱ्या संघाचा एक भाग असणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. या विजयामुळे देशात जो आनंद पसरला आहे त्यामुळे खेळाडू म्हणून आम्हीही भारावून गेलो आहोत,’ असं विराटने ट्विटर संदेशात म्हटलं आहे. (India T20 Champion)
Dear @narendramodi sir, thank you so much for your very kind words and your support and encouragement always. It has been a privilege to be a part of this team which has brought the cup home. We are deeply touched & overwhelmed with the happiness it has bought the entire nation. https://t.co/dpKiJiMFih
— Virat Kohli (@imVkohli) July 1, 2024
(हेही वाचा – India T20 Champion : वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकलेला)
टी-२० विश्वचषकातील विजयानंतर (India T20 Champion) पंतप्रधान मोदींनी बार्बाडोसला फोन करून खेळाडूंचं व्यक्तिश: अभिनंदन केलं. या विजेतेपदानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघाने पहिल्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकला आहे.
आणि अंतिम सामना संपल्यानंतर लगेचच विराट कोहलीने (Virat Kohli) निवृत्तीची घोषणा केली. ‘आम्ही खूप काळ या चषकासाठी वाट बघितलीय. रोहितचाच विचार करा. ९ टी-२० विश्वचषक तो खेळलाय. माझाही हा सहावा आहे. निदान आता आम्ही जिंकलो. शिवाय माझा हा शेवटचा टी-२० विश्वचषक आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. आता वेळ आली आहे नवीन खेळाडूंकडे कमान सोपवण्याची,’ असं विराट सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवरील मुलाखतीत म्हणाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community