India T20 Team : भारताच्या टी-२० संघ निवडीपूर्वी अजित आगरकर रोहित, विराटशी बोलणार

२०२२ नंतर रोहित आणि विराट टी-२० क्रिकेट खेळलेले नाहीत.

217
India T20 Team : भारताच्या टी-२० संघ निवडीपूर्वी अजित आगरकर रोहित, विराटशी बोलणार
India T20 Team : भारताच्या टी-२० संघ निवडीपूर्वी अजित आगरकर रोहित, विराटशी बोलणार
  • ऋजुता लुकतुके

२०२२ नंतर रोहित (Rohit Sharma) आणि विराट (Virat Kohli) टी-२० क्रिकेट खेळलेले नाहीत. (India T20 Team)

यावर्षी जून महिन्यात टी-२० विश्वचषक (T20 World Cup) होणार आहे. पण, त्यापूर्वी भारतीय संघ (Indian team) फक्त सहाच टी-२० सामने खेळला आहे. त्यातले तीन सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडले. तर उर्वरित तीन सामने अफगाणिस्तानविरुद्ध पुढील महिन्यात होणार आहेत. आणि या सहा सामन्यांतील कामगिरीवरून अजित आगरकरांच्या (Ajit Agarkar) निवड समितीला विश्वचषकासाठी भारतीय संघ (Indian team) निवडायचा आहे. (India T20 Team)

पण, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे ज्येष्ठ खेळाडू गेल्यावर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर टी-२० क्रिकेटच खेळलेले नाहीत. दोघांना टी-२० विश्वचषक (T20 World Cup) खेळण्याची इच्छा आहे, असं मात्र समजतंय. त्यामुळेच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर संघ निवडीपूर्वी रोहित आणि विराटशी बोलणार आहेत. (India T20 Team)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : वादग्रस्त ढाचा पाडला, तेव्हा तिथे उपस्थित होतो; देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक उत्तर)

३० खेळाडूंच्या कामगिरीवर अजित आगरकर ठेवणार लक्ष

टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी आता निवड समितीकडे संघ निवडीसाठी एकमेव टी-२० स्पर्धा आहे ती आयपीएल (IPL). आणि अजित आगरकर (Ajit Agarkar) या लीगमध्ये ३० खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवणार आहेत. आणि त्यातूनच टी-२० स्पर्धेसाठीचा संघ निवडण्यात येणार आहे. (India T20 Team)

सध्या शिवसुंदर दास आणि सलील अंकोला हे निवड समितीचे दोन सदस्य दक्षिण आफ्रिकेत आहेत. दुसऱ्या कसोटी दरम्यान अध्यक्ष अजित आगरकरही (Ajit Agarkar) आफ्रिकेत पोहोचणार आहेत. आणि हे तिघे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्याशी चर्चा करतील. रोहित आणि विराटचं टी-२० खेळण्याविषयीचं मत जाणून घेण्याबरोबरच दोघं अफगाणिस्तान विरुद्ध खेळायला उत्सुक आहेत का याचाही आढावा निवड समितीला घ्यायचा आहे. (India T20 Team)

शिवाय विश्वचषकाच्या दृष्टीने संघ तयार करण्याच्या दृष्टीने निवड समिती या तिघांशी चर्चा करेल. आयपीएल (IPL) पूर्वी निवड समितीला ३० संभाव्य खेळाडूंची नावंही तयार ठेवायची आहेत. (India T20 Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.