७०० दिवसांची प्रतीक्षा संपली…बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचे पहिले शतक!

152

शुभमन गिलने तब्बल ७०० दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक केले आहे. याआधी शुभमनची ब्रिसबेनमध्ये कसोटी शतकाची संधी हुकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये गिल ९१ रन्सवर आऊट झाला होता. परंतु आता चटोग्राम टेस्टमध्ये शुभमन गिलची तब्बल ७०० दिवसांची प्रतीक्षा संपली आहे.

( हेही वाचा : रेल्वे स्थानकांवर ट्रेन सुटण्याच्या १ तास आधी पोहोचा; प्रवाशांसाठी जारी केल्या विशेष सूचना )

बांगलादेश विरुद्ध शुभमन गिलने १४७ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. गिलने यावेळी १० चौकार आणि २ षटकार आहेत. ९९ धावांवर असताना त्याने पुढे येऊन लॉंग ऑनवर चौकार मारत आपले पहिले शतक पूर्ण केले. शुभमनने १५१ चेंडूत ११० धावा पूर्ण केल्या.

शुभमनला नशिबाची साथ

दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना शुभमनला नशिबाची साथ लाभली. ३२ व्या षटकात गिलविरुद्ध LBW चे अपील झाले होते. अंपायरने त्याला नॉट आऊट दिले. बांगलादेशने डीआरएस मागितली परंतु डीआरएसची टेक्नोलोजीमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने गिलला नशिबाची साथ मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.