India To Tour Sri Lanka : भारतीय संघ पुढील वर्षी श्रीलंकेत खेळणार ६ एकदिवसीय व टी-२० सामने 

भारतीय संघ २०२४ च्या मध्यावर श्रीलंकेचा दौरा करणार आहे. यात एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांचा समावेश असेल.

152
India To Tour Sri Lanka : भारतीय संघ पुढील वर्षी श्रीलंकेत खेळणार ६ एकदिवसीय व टी-२० सामने 
India To Tour Sri Lanka : भारतीय संघ पुढील वर्षी श्रीलंकेत खेळणार ६ एकदिवसीय व टी-२० सामने 

ऋजुता लुकतुके

भारतीय संघ पुढील वर्षी जून किंवा जुलै महिन्यात शेजारी देश श्रीलंकेचा (India To Tour Sri Lanka) दौरा करणार आहे. आणि या दौऱ्यात संघ एकदिवसीय तसंच टी-२० सामने खेळेल. आयसीसीवर नाराज असलेल्या लंकन क्रिकेट बोर्डाला दिलासा म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यातून आर्थिक विवंचनेत असलेल्या बोर्डाला आर्थिक मदत होईल. आणि त्यांच्या राष्ट्रीय क्रीडा वाहिनीलाही आर्थिक गणित सावरता येईल.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचं सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी जमत (India To Tour Sri Lanka) नाहीए. देशातील अनिश्चित वातावरणात लंकन सरकार तिथल्या क्रिकेट बोर्डाच्या कारभारात हस्तक्षेप करत आहे. अलीकडेच त्यांनी क्रिकेट बोर्ड बरखास्त करून क्रीडामंत्र्यांकडे श्रीलंकन बोर्डाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर आयसीसीने चिडून १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेऊन ते दक्षिण आफ्रिकेला दिलं.

(हेही वाचा-SA vs IND Tour : टी-२० सामन्यांमध्ये कप्तानीसाठी बीसीसीआय रोहीत शर्माचं मन वळवतील का?)

आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या लंकन बोर्ड आणि स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क घेतलेल्या क्रीडा वाहिनीचं त्यामुळे मोठं नुकसान होणार होतं. त्यामुळे लंकन बोर्डाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय तिथल्या सरकारने क्रिकेट बोर्डावर केलेली बरखास्तीची कारवाईही वेळेवर मागे घेतली. त्यामुळे लंकन क्रिकेटचा कारभारही आता पूर्ववत झाला आहे.

अशावेळी महत्त्वाचा सदस्य देश असलेल्या श्रीलंकेची नाराजी दूर करण्यासाठी आणि आर्थिक अडचणीतून उभं राहण्याची संधी मिळावी यासाठी घाई घाईने हा दौरा आयोजित करण्यात येत आहे. बीसीसीआयने या दौऱ्याला आता मान्यता दिली आहे. पण, यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा आधीच व्यस्त असलेला कार्यक्रम आणखी व्यस्त होणार आहे.

२०२४ मध्ये भारतीय संघ १० कसोटी, २१ टी-२० आणि २१ एकदिवसीय सामने (India To Tour Sri Lanka) खेळणार आहे. यातील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका या संघाची कसोटी पाहणाऱ्या असतील. आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा त्या भाग असतील.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.