India Tour of SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हे भारताचे मुख्य प्रशिक्षक, गौतम गंभीर सुट्टीवर

India Tour of SA : न्यूझीलंड बरोबरच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. 

101
India Tour of SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हे भारताचे मुख्य प्रशिक्षक, गौतम गंभीर सुट्टीवर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. जिथे भारत आणि आफ्रिका संघात टी२० मालिका होणार आहे. ही मालिका ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी एक मोठी माहिती समोर येत आहे की या दौऱ्यात गौतम गंभीर नाही तर व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाणार आहे. (India Tour of SA)

व्हीव्हीएस लक्ष्मणला भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवले जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. क्रिकबझ वेबसाईटने म्हटल्याप्रमाणे, ८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बीसीसीआयने भारतीय संघाची जबाबदारी माजी भारतीय दिग्गज व्हीव्हीएसकडे सोपवली आहे. (India Tour of SA)

(हेही वाचा – थांबा, विचार करा आणि मग कृती करा; Digital Arrest विषयी पंतप्रधानांनी केली जागृती)

साईराज बाहुतुले, हृषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष यांसारखे बंगळुरूमधील एनसीएमध्ये काम करणारे कर्मचारी आणि इतर प्रशिक्षक लक्ष्मणच्या कोचिंग स्टाफचा भाग असतील. बाहुतुले (मुख्य प्रशिक्षक), कानिटकर (फलंदाजी प्रशिक्षक) आणि घोष (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे ओमान येथे झालेल्या आशिया इमर्जिंग कप स्पर्धेत सहभागी झालेल्या इंडिया इमर्जिंग संघाचा भाग होते.

पुढील महिन्याच्या १० तारखेच्या सुमारास बॉर्डर-गावसकर करंडक खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे आहे. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाताना दक्षिण आफ्रिकेत जाणे गंभीरला शक्य नाही. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मणला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासोबत तिथे पाठवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला असावा. (India Tour of SA)

(हेही वाचा – Sharad Pawar गटाकडून चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या सुपूत्राला उमेदवारी)

भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी२० मालिका ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना ८ नोव्हेंबरला डर्बनमध्ये तर दुसरा सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. तिसरा आणि चौथा टी२० सामना अनुक्रमे १३ आणि १५ नोव्हेंबरला होणार आहे. (India Tour of SA)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भरतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, आवेश खान, यश दयाल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.