India Tour of Sri Lanka : गौतम गंभीरच्या नियुक्तीनंतर संघात होतायत ‘हे’ बदल 

India Tour of Sri Lanka : भारतीय संघात कोण दाखल, कुणाला वगळलं याचा लेखाजोखा

172
India Tour of Sri Lanka : गौतम गंभीरच्या नियुक्तीनंतर संघात होतायत ‘हे’ बदल 
India Tour of Sri Lanka : गौतम गंभीरच्या नियुक्तीनंतर संघात होतायत ‘हे’ बदल 
  • ऋजुता लुकतुके

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक म्हणून सूत्र हातात घेतल्यानंतर भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल झालाय तो म्हणजे सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-२० कर्णधार म्हणून झालेली नियुक्ती. रोहित शर्माने (Rohit Sharma,) टी-२० मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर संघाचा तेव्हाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याच (Hardik Pandya) नवीन कर्णधार असेल असं धरलं जात होतं. पण, आता हार्दिक उपकर्णधारही नाहीए. ती जागा शुभमन गिलने (Shubman Gill) घेतलीय. गंभीरचं मुख्य काम आहे २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी संघ बांधणं. त्यासाठी गंभीरची पसंती या दोघांना असल्याचं दिसतंय. (India Tour of Sri Lanka)

(हेही वाचा- Wagh Nakh: प्रतीक्षा संपली… शिवकालीन वाघनखं साताऱ्याच्या वस्तु संग्रहालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा)

श्रीलंका दौऱ्यातच गंभीरच्या पसंतीची चुणूक आपल्याला आणखी काही ठिकाणी दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा हर्षित राणा एकदिवसीय संघात आला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विश्वचषक संघातील कोण खेळणार आहे, कोणाला वगळलंय आणि कोण नवीन आलंय बघूया.  (India Tour of Sri Lanka)

टी-२० संघात जागा मिळवलेले खेळाडू, 

शुभमन गिल – टी-२० विश्वचषकात तो राखीव खेळाडू होता. आघाडीच्या फळीत रोहित (Rohit Sharma,), विराट (Virat Kohli), सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यांच्यामध्ये त्याला जागा मिळाली नव्हती. पण, तो आता भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिला जातोय. रोहितच्या जागी तो सलामीला येणार हे उघड आहे. त्यामुळे शुभमन (Shubman Gill) आणि यशस्वी ही डावी-उजवी जोडी सलामीला दिसू शकेल. झिम्बाब्वे दौऱ्यात शुभमन सगळ्यात यशस्वी फलंदाज होता.  (India Tour of Sri Lanka)

(हेही वाचा- Gadchiroli Naxalism: सी-६० कामांडोंचं अतुलनीय कार्य; उत्तर गडचिरोली ३५ वर्षांनंतर नक्षलवाद मुक्त )

रिंकू सिंग – रिंकू सिंगला (Rinku Singh) भारतीय टी-२० संघात जी काही थोडी संधी मिळाली, त्यात पाचव्या ते सातव्या क्रमांकाचा भरवशाचा फलंदाज म्हणून त्याने कामगिरी करून दाखवली आहे. परिस्थिती काहीही असो, तो नेटाने फलंदाजी करून संघाची नौका तारतो. विश्वचषकात मात्र तो राखीव खेळाडू होता. आता तो संघात परतलाय. (India Tour of Sri Lanka)

खलील अहमद – जसप्रीत बुमराच्या जागी खलील अहमद संघात आला आहे. तो ही विश्वचषकात राखीव होता. पण, आता झिम्बाब्वे दौऱ्यानंतर त्याला चांगली संधी मिळेल, असं दिसतंय. (India Tour of Sri Lanka)

(हेही वाचा- ठाणे, पालघर, रायगडला पुन्हा ‘Orange Alert’ तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम)

संघातून कुणाला वगळलं, विश्रांती?

जसप्रीत बुमरा – जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) सध्या जगातील सर्वोत्तम तेज गोलंदाजांपैकी एक आहे. भारतीय संघातील तो कोहिनूर आहे. त्यामुळे त्याला वगळणं शक्यच होणार नाही. पण, पुढील व्यस्त हंगाम बघता त्याला जपून वापरणं महत्त्याचं आहे. हे समजून त्याला लंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. (India Tour of Sri Lanka)

कुलदीप यादव – कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) टी-२० संघातून वगळणं तसं आश्चर्यकारक आहे. टी-२० विश्वचषकात आपल्या फिरकीने त्याने छाप पाडली होती. प्रतिस्पर्धी संघातील मधल्या फळीतील बळी तो हमखास मिळवून देत होता. मागच्या वर्षभरात मनगटी जादू दाखवणारा फिरकीपटू म्हणून तो नावारुपाला आला आहे. पण, श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका तो खेळणार नाहीए. तो एकदिवसीय संघात आहे. (India Tour of Sri Lanka)

(हेही वाचा- RTE प्रवेशाबाबत हायकोर्ट शुक्रवारी देणार निकाल; निकालावर हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून)

टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma,), विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे. विराट आणि जडेजाची जागा कायमस्वरुपी कोण घेतं याकडे आता लक्ष असेल. (India Tour of Sri Lanka)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.