India Tour of Sri Lanka : हर्षित राणाचा भारतीय क्रिकेट संघात समावेश कसा झाला?

India Tour of Sri Lanka : आयपीएलमध्ये गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली हर्षित तयार झाला आहे. 

159
Ind vs NZ, 3rd Test : हर्षित राणाला नेट्समध्ये विराटला गोलंदाजी करायला का आवडतं?
  • ऋजुता लुकतुके

२२ वर्षीय हर्षित राणा नवी दिल्लीतील साऊथ एक्सटेंशन भागात राहतो. तेज गोलंदाजीत लागते तो वेग, स्विंग आणि अचूकता त्याच्याकडे आहे. पण, वयाचा परिणाम म्हणा किंवा स्वभाव. तो लवकर नाउमेद होतो. त्याच्या लहानपणीच्या आठवणी अशाच आहेत. त्याच्याच शब्दात, ‘दिल्ली तुम्हाला अनेकदा नाउमेद करते. पण, केवळ वडिलांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मी टिकून राहिला.’ (India Tour of Sri Lanka)

कधीही संघातून डावललं किंवा संधी मिळाली नाही, चांगली कामगिरी झाली नाही, की घरातील आपल्या खोलीत जाऊन रडण्याची त्याची सवय लहानपणापासून होती. पण, वडील प्रदीप राणा अशावेळी त्याला समजावायचे. ‘तीन लोकांमुळे मी आज क्रिकेट खेळतोय आणि भारतीय संघापर्यंत पोहोचलोय. वडील, वैयक्तिक प्रशिक्षक अमित भंडारी आणि गौतम गंभीर. मी कधीही हताश बसलेलो असलो की, गौती भैय्या मला म्हणायाच, असा का बसलायस. मला माहीत आहे तूच मला सामना जिंकून देणार आहेत,’ असं हर्षित सांगतो. (India Tour of Sri Lanka)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : भारतीय कुस्तीपटूंमध्ये कुणाला आहे पदकांची आशा?)

या गोलंदाजांना मिळाली संधी 

गौतम गंभीर यांनी दाखवलेला विश्वास अखेर हर्षितने सार्थही ठरवला. त्याने गेल्यावर्षी आयपीएल हंगामात १९ बळी मिळवले. तर विजय हजारे चषक स्पर्धेतही त्याच्या नावावर १४ सामन्यांत २५ बळी आहेत. तर सय्यद अली टी-२० स्पर्धेत त्याने २८ बळी मिळवले आहेत. त्यानंतर निवड समितीने त्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली. (India Tour of Sri Lanka)

मागोमाग आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून देण्यातही त्याची भूमिका मोलाची होती. दिशा आणि टप्प्याचं अचूक भान असलेला गोलंदाज अशी ख्याती हर्षितने कमी वेळेत मिळवली आहे. मागची दोन वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्या जोरावर भारतीय एकदिवसीय संघातही स्थान मिळवलं आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी हे सध्या भारताने प्रमुख दोन गोलंदाज आहेत. त्यांच्यानंतर अर्शदीप, मोहम्मद सिराज आणि खलिल अहमद यांना सध्या संधी मिळाली आहे. पण, तेज गोलंदाजांचा नवीन ताफा तयार करण्यावर आता संघ प्रशासनाचा भर आहे. (India Tour of Sri Lanka)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.