- ऋजुता लुकतुके
भारतात टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा जाहीर सत्कार सुरू असताना दुसऱ्या फळीचा भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यावर पोहोचला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इथं भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. निवड समितीने ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देत दुसऱ्या फळीतील खेळाडूंना झिंबाब्वे दौऱ्यावर पाठवलं आहे. तर संघाचे प्रशिक्षक म्हणून क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण (V.V.S Laxman) संघाबरोबर आहेत. (India Tour of Zimbabwe)
या स्पर्धेचं वेळापत्रक, भारतीय संघ आणि हे सामने भारतात कुठे प्रसारित होणार हे जाणून घेऊया. येत्या शनिवारी मालिकेतील पहिला टी-२० सामना हरारे स्पोर्ट्स क्लबला होणार आहे. (India Tour of Zimbabwe)
(हेही वाचा- ‘रोहितला इतकं भावूक होताना १५ वर्षांत पहिल्यांदा पाहिलं,’ -Virat Kohli)
टी-२० विश्वचषकात अंतिम अकरांमध्ये स्थान न मिळालेले खेळाडू आधी झिंबाब्वेला जाणार होते. पण, बेरिल चक्रीवादळामुळे ३ दिवस संघ तिथेच अडकून पडला. त्यामुळे संजू सॅमसन (Sanju Samson), यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्याऐवजी बीसीसीआयने (BCCI) आता बदली खेळाडू दिले आहेत. या मालिकेत आयपीएल गाजवलेले रियान पराग (Rian Parag) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आपलं नशीब आजमावणार आहेत. (India Tour of Zimbabwe)
आधी स्पर्धेचं वेळापत्रक पाहूया
भारतीय संघाचा झिंबाब्वे दौरा (२०२४) |
||
दिवस |
सामना |
ठिकाण |
६ जुलै |
पहिला टी-२० |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
७ जुलै |
दुसरा टी-२० |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
१० जुलै |
तिसरा टी-२० |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
१३ जुलै |
चौथा टी-२० |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
१४ जुलै |
पाचवा टी-२० |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
पाचही टी-२० सामने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर होणार आहेत. सामन्याची वेळ भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजताची आहे. भारतात सोनी लिव्ह या ओटीटी ॲपवर आणि सोनी नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर पाहता येईल. (India Tour of Zimbabwe)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community