भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या बॉर्डर – गावसकर ट्रॉफीला गुरुवार ९ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. पहिला कसोटी सामना सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव लगेच आटोपला. भारतीय गोलंदाजींना यावेळी चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला आहे. आजच्या कसोटी सामन्यात जाडेजा आणि अश्विन यांनी मिळून तब्बल ८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली आहे.
( हेही वाचा : ठाणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक मार्गांमध्ये बदल )
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. परंतु भारताने केलेल्या अप्रतिम गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांमध्ये आटोपला.
अश्विनचा जागतिक रेकॉर्ड
अश्विनने पहिल्या डावात ३ विकेट्स घेत कसोटी मध्ये ४५२ विकेट्स आपल्या नावे करत जागतिक विक्रम केला आहे. सर्वात जलदगतीने विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ८९ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली असून त्याच्या आधी केवळ श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरन आहे त्याने ८० सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.
Join Our WhatsApp Community