IND VS AUS : ११ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ६ खेळाडू केले बाद, तिसऱ्या कसोटीत भारताची स्थिती काय?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफिच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाची फलंदाजी ढासळली परंतु दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला चांगली सुरूवात मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर आटोपला असून त्यांच्याकडे केवळ ८८ धावांची आघाडी आहे.

( हेही वाचा : ज्यांनी हक्कभंग दाखल केला तेच समितीत; हा न्याय नाही – अजित पवार)

सध्या भारत आपला दुसरा डाव खेळत आहे. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि स्टार फलंदाज विराट कोहली फलंदाजी करत आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाने आक्रमक फलंदाजी केली परंतु भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही.

११ धावांमध्ये ६ गडी बाद

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने १५६ धावांवर डाव सुरू केल्यावर १८६ धावांपर्यंत एकही विकेट पडली नाही परंतु त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव या जोडीने दमदार गोलंदाजी करत प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आणि १८६ धावांवर ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट पडल्यावर १९७ वर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे ६ गडी केवळ ११ धावांमध्ये माघारी गेले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here