भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली असून या मालिकेचा सध्या तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला डावात १७७ धावा केल्या यानंतर भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना तब्बल ४०० धावा केल्या.
पहिल्या डावात गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला रोखले
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु भारताच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला १७७ धावांवर रोखले. मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशिवाया कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही. यामुळेच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला. जाडेजाने ५ तर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या.
भारताचा ४०० धावांचा डोंगर तर २२३ धावांची आघाडी
यानंतर भारताने चांगली सुरूवात केली. रोहित शर्माचे शतक झळकावले यानंतर रवींद्र जाडेजाने ७० धावा केल्या तर अक्षर पटेलने ८४ धावांची खेळी केलीय त्याच्या खेळीत १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अक्षर पटेलचे शतक अगदी थोड्यासाठी हुकले. परंतु या तीन खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने २२३ धावांची आघाडी घेतली.
Join Our WhatsApp Community