टीम इंडियाची ‘कसोटी’! WTC च्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावे लागणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला अहमदाबादमधील कसोटी सामना काही केल्या जिंकावा लागणार आहे. इंदूर कसोटीमध्ये ९ गडी राखून पराभव झाल्यामुळे टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना ९ मार्चपासून सुरू होईल.

चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाल्यास, किंवा हा सामना अनिर्णित राहिला तर WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला श्रीलंके विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे अहमदाबादच्या चौथ्या कसोटीमध्ये टीम इंडियासमोर कांगारुंना चीतपट करण्याचे आव्हान असणार आहे.

टीम इंडियाने ही संपूर्ण मालिका ३-१ ने जिंकली तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा WTC चा अंतिम सामना क्रिकेटप्रेमींना पहावयास मिळेल. लंडनमध्ये ७ जूनला WTC चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

ICC ने दिली माहिती

  • भारत आणि श्रीलंका यांच्यात फायनल होण्याची शक्यता २.८ टक्के आहे.
  • ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप होण्याची शक्यता ८.३ टक्के आहे.
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना होऊ शकतो याची शक्यता ८८.९ टक्के आहे. WTC मध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना ३-१ ने जिंकणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here