भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेत महत्त्वाचा बदल! तिसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले

174

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी या स्पर्धेला नागपूरातून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने १-० ची आघाडी घेत मोठ्या फरकाने जिंकला आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला १७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून त्यापूर्वी तिसऱ्या सामन्यात महत्त्वाचा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! ‘बेस्ट’च्या ताफ्यात देशातील पहिली एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल; प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा )

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना हा धर्मशाला येथील मैदानात खेळवण्यात येणार होता परंतु हा सामना आता इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

BCCI ने सामन्याचे ठिकाण का बदलले?

BCCI ने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेचे स्थळ बदलण्याची माहिती दिली आहे. त्यामुळे हा सामना १ मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. सुरूवातीला धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार होता. परंतु खेळपट्ट्यांच्या समस्यांमुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे.

…तरच WTC मध्ये मिळणार संधी

भारतीय क्रिकेट संघाला ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये संधी मिळेल की नाही याचे भविष्य ही मालिका निश्चित करणार आहे. ही मालिका जिंकणे भारताला आवश्यक आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही कसोटी मालिका ३-१, ३-०, किंवा २-२ ने जिंकणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.