रोहित शर्मासह हा खेळाडू संघाबाहेर; BCCI ने ट्वीट करत दिली माहिती

203

भारत विरुद्ध बांगलादेश या दुसऱ्या कसोटी सामन्याला २२ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून या कसोटीसामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मानंतर आता भारताचा अजून एक खेळाडून दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाबाहेर असणार आहे. BCCI ने यासंदर्भात माहिती दिली आहे.

( हेही वाचा : श्रद्धा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; फडणवीसांची विधानसभेत घोषणा )

या सामन्यात भारताने विजय मिळवल्यात भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची शक्यता वाढणार आहे. परंतु रोहित शर्माला वनडेमध्ये जी दुखापत झाली होती ती अजून बरी झालेली नसल्याने शर्मा दुसऱ्या सामन्यातही खेळणार नसल्याचे BCCI ने स्पष्ट केले आहे.

रोहितनंतर हा खेळाडू संघाबाहेर

रोहित शर्मासमवेत आता स्नायू दुखावल्यामुळे नवदीप सैनी सुद्धा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नवदीप सैनीच्या जागी संघात कोणाचा समावेश होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.