-
ऋजुता लुकतुके
आशिया चषकाच्या शेवटच्या सुपर ४ लढतीत भारतीय संघाचा बांगलादेशकडून पराभव झाला. पण, या लढतीसाठी संघात केलेल्या ५ बदलांचं कर्णधार रोहीत शर्माने समर्थनच केलं आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालामुळे स्पर्धेतील अंतिम फेरीतील संघांवर कुठलाही परिणाम होणार नव्हता. बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपलेलं होतं. म्हणूनच भारतीय कर्णधार रोहीत शर्माने संघात घाऊक प्रमाणात पाच बदल केले.
पण, नेमका संघाला पराभव पत्करावा लागला. कारण, या पाचही खेळाडूंपैकी एकदा अक्षर पटेल सोडला तर इतर कुणीही सामन्यात आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. पण, तरीही सामन्यानंतर रोहीत शर्मा शांत होता. संघात केलेले बदल दूरचा विचार करून केलेले होते, असं त्याचं म्हणणं आहे.
#TeamIndia put up a solid fight as the things went right down to the wire but it was Bangladesh who won the match.
Scorecard ▶️ https://t.co/OHhiRDZM6W#AsiaCup2023 | #INDvBAN pic.twitter.com/qy6Z4fbmiC
— BCCI (@BCCI) September 15, 2023
(हेही वाचा – Ban From Maharashtra Government : परराज्यात ऊस नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी)
‘सगळ्या खेळाडूंना स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी, असा विचार आम्ही केला. खेळाडूंना सामने खेळण्याचा सराव असणं महत्त्वाचं. त्यामुळे विश्वचषक निवडीची ज्यांना संधी आहे, त्यांना इथंही खेळण्याची संधी मिळावी एवढाच विचार संघ बदलामागे होता. अर्थात, त्यासाठी विजयाशी तडजोड आम्ही करणार नव्हतो,’ असं रोहीत सामना संपल्यानंतर म्हणाला.
पण, अक्षर पटेलचं रोहीतने कौतुक केलं. अक्षर सामना खेचून आणू शकला नाही. पण, त्याने केलेल्या निकराच्या प्रयत्नांवर रोहीत खुश आहे. तर शुभमन गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीचाही त्याने खास उल्लेख केला. मागच्या १२ महिन्यात गिलने ७० च्या वर सरासरीने धावा केल्या असल्याचं त्याने नमूद केलं. भारतीय संघाचा मुकाबला आता अंतिम फेरीत श्रीलंकेशी होणार आहे. आणि त्यासाठी विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा हे मुख्य खेळाडू संघात परततली, अशीच चिन्ह आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community