बुधवारी टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात पावसाने एंट्री केली होती. बांग्लादेश आणि भारत या दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत बांग्लादेश समोर 185 धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. पण आलेल्या पावसाने भारताच्या विजयाचे गणित बिघडवले असून, आता बांग्लादेशला जिंकण्यासाठी 54 चेंडूंत 85 धावांची गरज आहे.
बांग्लादेशला 151 धावांची गरज
भारताने प्रथम फलंदाजी करत विराट कोहली लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवच्या खेळीच्या जोरावर बांग्लादेशला 185 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या सलामीवीर जोडीने जलद धावा करत केवळ 7 षटकांत बिनबाद 66 धावा ठोकल्या आहेत. पण सामन्यात आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार, बांग्लादेशला विजयासाठी 16 षटकांत 151 धावांची गरज आहे.
बांग्लादेशला दुसरा झटका
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचा सलामीवीर लिटॉन दासने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याने केवळ 27 चेंडूंत 60 धावा केल्या. के एल राहुलच्या अप्रतिम थ्रोमुळे दास धावचित झाला. तसेच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर नजमुल हौसेन हा झेलबाद झाला आहे. त्यामुळे बांग्लादेशला 85 धावांवर दुसरा झटका बसला आहे. या सामन्यात कोणाचा विजय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community