खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारतीय गुप्तचर संघटनांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केल्यावर भारताने कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. अशातच आता या वादात भारताचा लाडका खेळाडू विराट कोहलीने देखील उडी घेतली आहे. त्याने घेतलेल्या निर्णयावरून विराटाचे देशप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे.
नेमका प्रकार काय?
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कॅनडास्थित (India vs Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंह उर्फ शुभला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. वादग्रस्त ‘खलिस्तानी चळवळी’शी त्याच्या कथित संबंधांमुळे शुभला खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे. खलिस्तानी चळवळीने पंजाबला भारतापासून वेगळा देश बनवण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला नेहमीच भारतीयांच्या आणि भारत सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, तरुणांचा आवडता पंजाबी गायक शुभने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर भारताचा नकाशा शेअर केला आहे, ज्यामधून पंजाब, काश्मीर आणि ईशान्य भाग गायब आहेत. कॅप्शनसोबतच ‘पंजाबसाठी प्रार्थना’, यामुळे त्याला मुंबईतील एक शो देखील गमवावा लागला होता.
(हेही वाचा – India vs Canada : एनआयएकडून कॅनडाशी संबंधित ४३ दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी)
त्याने शेअर केलेल्या या पोस्टमुळे (India vs Canada) विराट कोहलीसह हार्दिक पंड्या, के एल राहुल यांनीदेखील त्याला अनफॉलो केले आहे. विराट कोहली हा युवा वर्गासाठी आदर्श आहे, त्याला बरेच युवा मुलं फॉलो करतात. कोहलीच्या या एका कृतीमुळे मोठा फरक पडेल, असे म्हटले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community