एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २९व्या सामन्यात भारताचा सामना इंग्लंडसोबत होत आहे. (India vs England) या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भारताने सलग ५ सामने जिंकले आहेत. असे असले तरी इंग्लंडसोबत चालू असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी अक्षरशः कोसळली.
(हेही वाचा – Kerala Blasts : केंद्रीय मंत्र्याची स्पष्टोक्ती; ‘केरळ सरकारने हमासला बोलण्याची परवानगी दिल्यामुळेच…’)
सलामीवीर शुबमनला १३ चेंडूत ९ धावा करता आल्या. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला लय गवसली नाही. ९ चेंडूत एकही धाव त्याला करता आली नाही. त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. ख्रिस वोक्सने शुभमन गिलला त्रिफळाचीत केले, तर डेव्हिड विलीने विराट कोहलीला झेलबाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यर १६ चेंडूत चार धावा करून, तर लोकेश राहुल ५८ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताला आणखी मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १०१ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. रवींद्र जडेजा १३ चेंडूत ८ धावा करून, तर मोहम्मद शमी ही लगेचच पॅवेलियनमध्ये परतले. रोहित शर्माने केलेल्या चिवट खेळीनंतर सूर्यकुमार यादवने खेळपट्टीवर टिकून राहत ४९ धावा केल्या. त्यानंतर एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. (India vs England)
एकंदर स्थिती पाहता इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजीला सूरच गवसला नाही. आता इंग्लंडसमोर २३० धावांचे लक्ष्य आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. गेल्या काही सामन्यांत भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारून गोलंदाजांच्याच मदतीने प्रतिस्पर्धी संघावर भेदक मारा केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारावी लागली असली, तरी बाजू पालटवण्याचे दायित्व पुन्हा गोलंदाजांवरच आल्याचे दिसत आहे. (India vs England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community