India Vs Ireland : भारताचा आयर्लंडवर ३३ धावांनी विजय : सलग तिसरी T-20 मालिका जिंकली

152
India Vs Ireland : भारताचा आयर्लंडवर ३३ धावांनी विजय : सलग तिसरी T-20 मालिका जिंकली

स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (India Vs Ireland) दुखापतीनंतर तब्बल ११ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करतांना आता इतर सर्व सामने खेळण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्याने दाखवून दिले. अशातच भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंडचा (India Vs Ireland) ३३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या कॅप्टनसीचे सध्या कौतुक होत आहे.

भारताने या सामन्यात आयर्लंडला (India Vs Ireland) एकूण १८६ धावांचे आव्हान दिले. त्यानंतर आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार ७२ धावांच्या जोरावर १५२ धावांपर्यंत मजल मारली.

(हेही वाचा – BMC : राष्ट्रीय फेरीवाला धोरणाबाबत मुंबई महापालिका उदासीन का ?)

भारताकडून (India Vs Ireland) रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने या सामन्यात स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. त्याने २० व्या षटकात बाईजच्या ४ धावा सोडल्या तर एकही धाव दिली नाही. आधीचा बुमराह पुन्हा पहायला मिळाल्याने चाहते देखील खुश झाले. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहचा हा कर्णधार म्हणून पहिला मालिका विजय आहे.

भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात (India Vs Ireland) आयर्लंविरूद्ध विजयासाठी १८६ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संजू सॅमसनने २६ चेंडूत ४० धावा केल्या.

संजू आणि ऋतुच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंहने (India Vs Ireland) आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये २१ चेंडूत ३८ धावा करत भारताला १८० च्या पार पोहचवले. त्याला शिवम दुबेने १६ चेंडूत नाबाद २२ धावा करत चांगली साथ दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.