भारत-न्यूझीलंड संघांची रंगणार मॅच, जाणून घ्या वेळापत्रक

68

टी-20 विश्वचषक स्पर्धा संपली असून, ऑस्ट्रेलिया संघाला विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळाला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत कमाल करु शकला नाही. पण, आता पुन्हा एकदा भारत अॅक्शन मोडमध्ये आला असून, भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबद्दलची माहिती यापूर्वीच दिली आहे. या वेळापत्रकात विविध देशांसोबत भारत 4 टेस्ट, 3 वनडे आणि 14 T20 सामने खेळणार आहे.  सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांनी होणार आहे

बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड टी-20 आणि एकदिवसीय सामने रंगणार आहेत. टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडची खेळी सर्वोत्तम होती. आपल्या सातत्यपूर्ण खेळाने न्यूझीलंडने विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळे न्यूझीलंडसोबत होणारे हे सामने भारतासाठी आव्हानात्मक आहेत. या सामन्यांचे वेळापत्रक खाली दिले आहे.

असे आहे वेळापत्रक 

टी-20 मालिका

पहिला सामना – बुधवारी 17 नोव्हेंबर, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, सायंकाळी ७ वा.

दुसरा सामना – शुक्रवार, 19 नोव्हेंबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम रांची, सायंकाळी ७ वा.

तिसरा सामना – रविवार, 21 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता, सायंकाळी ७ वा.

कसोटी मालिका

पहिला सामना – 25 ते 29 नोव्हेंबर, ग्रीन पार्क कानपूर, सकाळी 9.30 वा.

दुसरा सामना – 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम मुंबई, सकाळी 9.30 वा.

 (हेही वाचा : कोटींच्या घड्याळांवर दिलखुलास उत्तर! काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.