भारताला मोठा धक्का! ‘हे’ तीन दिग्गज खेळाडू मुंबई टेस्टमधून आऊट

114

भारत विरुद्ध न्यूझिलंड दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पण, या निर्णायक कसोटी सामन्याच्या आधीच भारतातील तीन महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी सामन्याचे कर्णधारपद सांभाळणा-या अंजिक्य रहाणे, रविद्र जडेजा आणि ईशांत शर्मा या दिग्गज खेळाडूंना दुखापतीमुळे या दुस-या कसोटी मालिकेतून आऊट व्हाव लागलं आहे. अशी माहिती ट्विट करुन बीसीसीआयने दिली आहे.

बीसीसीआय अध्यक्षांची माहिती

वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या डाव्या हाताच्या करंगळीला कानपूर येथे पहिला कसोटी सामना खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दुस-या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही, त्याला बीसीसीआयची मेडिकल टीम माॅनिटर करत आहे. असे बीसीसीआयने म्हटले आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्याला या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. तसेच, कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना अजिंक्य रहाणेच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तो पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे मुंबईतील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी परिपत्रकातून दिली आहे.

विराट कोहलीचे पुनरागमन

कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्याने टीम इंडियाला ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे. या निर्णयक टेस्टमध्ये टीम इंडियातील 3 प्रमुख खेळाडू आऊट झाल्यानं भारतीय टीमला मोठा धक्का बसला आहे. मुंबई टेस्टमध्ये विराट कोहली पुनरागमन करत असून तो अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणार आहे.

 (हेही वाचा: गोदाकाठी साहित्याचं महाकुंभ! आजपासून 94 व्या मराठी साहित्य संमेलनाचा ‘श्रीगणेशा’ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.