रविचंद्रन अश्विन आणि अंपायर यांच्यात वाद, द्रविडला करावी लागली मध्यस्थी

117

रविचंद्रन अश्विन अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर वादात सापडला आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो वादाच्या भोव-यात अडकत असतो. आता पुन्हा एकदा नवा वाद अश्विनने ओढावून घेतला आहे. कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या  न्यूझीलंडविरुद्धच्या  कसोटीदरम्यान अश्विन आणि मैदानावरील पंच नितीन मेनन यांच्यात जोरदार वादावादी झाली.

असा सुरु झाला वाद

कानपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. रविचंद्रन अश्विनने सलामीवीर विल यंगला बाद करत 151 धावांची सलामी भागीदारी मोडून काढत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. न्यूझीलंडच्या डावातील 77 वे षटक सुरु होते तेव्हा अश्विन गोलंदाजी करत होता. यावेळी अश्विन स्टंपच्या अगदी जवळ गोलंदाजी करत होता. हे करताना अश्विन नॅान स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या अंपायर आणि फलंदाजासमोर अनेकवेळा आला. ज्यावर अंपायर मेनन यांनी आक्षेप घेतला.

कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांची मध्यस्थी

अश्विन देखील अंपायरच्या आक्षेपावर ठाम होता कारण त्याच्या म्हणण्यानुसार सर्व काही नियमानुसार घडलं होतं. अश्विन आणि पंचांमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेने मध्यस्थी केली आणि तोही अंपायरला समजावताना दिसला. यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही कॅमेऱ्यात दिसला, जो थेट थर्ड अंपायर जवागल श्रीनाथ यांच्याशी बोलताना दिसला.

  (हेही वाचा: ‘गरिबी’ निर्देशांकात पहिली चार राज्ये ही भाजपाशासित, महाराष्ट्र कितव्या स्थानी? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.