बुधवार १५ नोव्हेंबर रोजी भारताने न्यूझीलंड (India vs New Zealand Semi-Final Match) संघाला पराभूत करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यावेळी भारतीय संघाने अनेक विक्रम केले. अशातच टीम इंडिया सोबत डिस्ने + हॉटस्टारने देखील एक नवीन विक्रम केला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड ही सेमी फायनलची (India vs New Zealand Semi-Final Match) मॅच तब्बल ५.३ कोटी प्रेक्षकांनी एकाच वेळी डिस्ने + हॉटस्टारवर बघण्याचा रेकॉर्ड झाला आहे.
(हेही वाचा – Virat Kohli 50th Century : विराट कोहली आता रिकी पाँटिंगला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट मधील तिसरा यशस्वी फलंदाज )
डिस्नी + हॉटस्टारने बुधवारी या विश्वचषक 2023 मध्ये भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand Semi-Final Match) सामन्यादरम्यान दुसऱ्यांदा दर्शकसंख्येचा नवा विक्रम नोंदवला. यापूर्वी 4.3 कोटी प्रेक्षक संख्येचा विक्रम होता, तो आता थेट ५.३ कोटी इतका झाला आहे.
Thank you #TeamIndia fans and Disney+ hotstar users for breaking the record, yet again! 🎉🥳
Now, that’s what we call a knockout performance! 🏏🔥#CWC23 pic.twitter.com/kIez9YAEDy
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) November 15, 2023
आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट (India vs New Zealand Semi-Final Match) विश्वचषक स्पर्धा जाहिरात-समर्थित स्वरूपात विनामूल्य प्रसारित करण्याच्या डिस्ने + हॉटस्टारच्या निर्णयाला विक्रमी शिखर समवर्ती दर्शकसंख्येचे श्रेय दिले जाऊ शकते. अर्थात, या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएल हंगामात जिओसिनेमाच्या यशानंतर हे पाऊल उचलण्यात आले, ज्याने सर्व सामने या व्यासपीठावर विनामूल्य दाखवण्याचा निर्णय घेतला. (India vs New Zealand Semi-Final Match)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community