भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका; कुठे पाहता येणार लाईव्ह सामना? पहा संपूर्ण वेळापत्रक

भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये टी २० मालिका खेळवण्यात येणार असून पहिल्या सामन्याला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. वनडे मालिकेमध्ये किवींना व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टी२० मालिकेला सुरूवात होणार आहे. हा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार याविषयी जाणून घेऊया…

( हेही वाचा : भुसावळमध्ये भूकंपाचे धक्के! ३.३ रिश्टर स्केल तीव्रता)

कधी सुरु होणार सामना ?

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला सामना २७ जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार ७ वाजता खेळवण्यात येणार आहे. त्याआधी नाणेफेक होईल.

कुठे पाहता येईल लाईव्ह सामना ?

क्रिकेटप्रेमींना हा सामना लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर पाहता येईल. तसेच हॉटस्टारवर या सामन्याचे स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.

भारतीय टी२० संघ

हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार

टी २० सामन्याचे वेळापत्रक

  • पहिला टी २० सामना – २७ जानेवारी २०२३ – रांची
  • दुसरा टी २० सामना – २९ जानेवारी २०२३ – लखनौ
  • तिसरा टी २० सामना – १ फेब्रुवारी २०२३ – अहमदाबाद

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here