श्रीलंकेनंतर आता भारताचे मिशन न्यूझीलंड! पहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

श्रीलंकेवर विजय मिळवून आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० अशा दोन्ही मालिकांमध्ये विजय मिळवला. यानंतर आता न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह तीन टी २० सामने खेळवले जाणार आहेत. मंगळवार १८ जानेवारीपासून या सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे आणि त्यानंतर २७ तारखेनंतर टी२० सामने खेळवले जातील.

( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! घरभाडे भत्त्याच्या नियमांमध्ये बदल)

भारताच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक ( सामना- तारीख- ठिकाण)

  • पहिला वनडे सामना – १८ जानेवारी – राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
  • दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी – हुतात्मा वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर
  • तिसरा वनडे सामना – २४ जानेवारी – होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर

एकदिवसीय संघ – रोहित शर्मा ( कर्णधार ) , ईशान किशान, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दित पंड्या, वाशिंग्टन सुंदर, शाहबाज यादव, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

टी २० मालिकेचे वेळापत्रक ( सामना- तारीख- ठिकाण)

  • पहिला टी२० सामना – २७ जानेवारी २०२३ – रांची
  • दुसरा टी२० सामना – २९ जानेवारी २०२३ – लखनौ
  • तिसरा टी२० सामना – १ फेब्रुवारी २०२३ – अहमदाबाद

टी२० संघ – हार्दिक पंड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप चहल, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here