दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाला दणका! नेमके काय आहे प्रकरण?

146

भारतीय संघाने पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला आहे. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने ३४९ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीपूर्वी ICC ने भारताला मोठा दणका दिला आहे.

( हेही वाचा : MPSC कडून ८ हजार १६९ पदांसाठी मेगाभरती! २०२३ ची पहिली आणि मोठी जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज)

हैदराबादमध्ये झालेल्या पहिला वनडे सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे ICC ने संघाच्या मॅच फीमधील ६० टक्के रक्कम दंड म्हणून कापली आहे. आयसीसीच्या मॅच रेफरी एलिट पॅनलचे प्रमुख श्रीनाथ यांनी ही कारवाई केली आहे. आयसीसीच्या नियम क्रमांक २.२२ नुसार दिलेल्या वेळेत षटत पूर्ण न केल्यास प्रत्येक षटकामागे खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्या मॅच फी मधील २० टक्के रक्कम कापली जाते. यानुसार आता भारतीय संघाला ६० टक्के मॅच फीचा दंड सुनावण्यात आला आहे. दुसऱ्या सामन्यात सुद्धा स्लो ओव्हर रेटचा फटका रोहितला बसून त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.

शुभमनचे द्विशतक

शुभमन द्विशतक ठोकणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला असून याआधी असा विक्रम सचिन, रोहित शर्मा, ईशान किशन यांच्या नावे नोंद आहे. शुभमनने १४९ चेंडूमध्ये १९ चौकार आणि ९ षटकार ठोकत द्विशतक पूर्ण केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.