India VS New Zealand : रोहित-शुभमन गिलची शतकी खेळी! नाबाद २०० धावांची भागिदारी

भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडेला सुरूवात झालेली आहे. वनडे मालिकेतील तिसरा सामना हा इंदूरमध्ये खेळवला जात आहे. हा सामना जिंकल्यास भारत ३-० या फरकाने ही मालिका जिंकेल आणि वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी झेप घेणार आहे.

( हेही वाचा : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ! अश्लील नृत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश)

या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनीही शतक झळकावले आहे. शुभमन गिलने तिसऱ्या वनडे सामन्यात ७२ चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकार लगावत १०३ धावा पूर्ण केल्या तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने ८२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यावेळी रोहितने ९ चौकार आणि ६ षटकार मारत १०० धावा पूर्ण केल्या. वनडेमध्ये रोहितने सलग दुसरे शतक झळकावले आहे.

वर्ल्डकपमध्ये स्थान निश्चित

२०२२ मध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ओपनिंग जोडीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर BCCI चांगल्या सलामीवीराच्या शोधात होते. शुभमन गिलच्या रुपात भारतीय क्रिकेट संघाला चांगला सलामीवीर मिळाला असून आता गिलचे वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील स्थान पक्के झाले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here