दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला मात देत फायनलमध्ये धडक मारली आहे.
( हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका; कुठे पाहता येणार लाईव्ह सामना? पहा संपूर्ण वेळापत्रक )
भारताचा फायनलमध्ये प्रवेश
भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने फलंदाजी करत १०७ धावा केल्या. भारताकडून परश्वी चोप्राने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. भारताने ११० धावा करत ८ विकेट्सनी ही मॅच जिंकली आहे.
यावेळी श्वेता शेहरावत हिने नाबाद ६१ धावांची खेळी केली. यामुळे भारताने ८ विकेट्सने सामन्यात विजय मिळवला आहे. भारत या स्पर्धेत ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र टीम इंडियाने पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Join Our WhatsApp Community