-
ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात जसप्रीत बुमराचं नाव नाहीए. हिंदुस्थान पोस्टनेही गुरुवारी बुमरा खेळणार की नाही याविषयीची अनिश्चितता व्यक्त करणारी बातमी दिली होती. पण, त्याच्या अनुपस्थितीचं कारण काहीसं काळजी वाढवणारं असल्याचं लक्षात आलं आहे. ‘बुमराची तब्येत अजून सुधारलेली नाही,’ असं रोहित शर्मा नाणेफेकीच्या वेळी म्हणाला. आणि त्यामुळे बुमराच्या जागी मोहम्मद सिराज संघात आला आहे. (India vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा- Ind vs NZ, 3rd Test : मुंबई कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती?)
‘आम्ही या मालिकेत चांगला खेळ केलेला नाही. ही खेळपट्टी चांगली दिसतेय. आम्ही इथं चांगलं खेळू अशी आशा वाटतेय. बुमरा अजून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी सिराज संघात आलाय. तो एकमेव बदल संघात आहे,’ असं रोहित तेव्हा म्हणाला होता. त्यानंतर काही मिनिटांतच बीसीसीआयने एक ट्विटकरून बुमराच्या तंदुरुस्तीवर आणखी थोडा प्रकाश टाकला. (India vs NZ, 3rd Test)
UPDATE:
Mr Jasprit Bumrah has not fully recovered from his viral illness. He was unavailable for selection for the third Test in Mumbai.#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 1, 2024
‘व्हायरल तापातून बुमरा अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नाही,’ असं बीसीसीआयने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ३० आणि ३१ तारखेला बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी अनिवार्य सराव शिबीर आयोजित केलं होतं. तेव्हा बुमरा त्यात सहभागी झाला नव्हता. भारतीय गोटातून त्याविषयी उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत होत्या. बुमराने विश्रांतीची विनंती केल्याचंही बोललं जात होतं. कारण, गौतम गंभीर यांनी ३० तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेत बुमरा तंदुरुस्त असल्याचं विधान केलं होतं. ‘बुमरा तंदुरुस्त आहेत तो काही प्रश्न नाही,’ असं गंभीर त्यावेळी म्हणाले होते. (India vs NZ, 3rd Test)
त्यामुळे मग बुमरा खेळणार की नाही आणि नाही खेळला तर बीसीसीआयने हा निर्णय घेतला की, बुमराने तशी मागणी केली एवढीच चर्चा गुरुवारी वानखेडे मैदानाभोवती सुरू होती. सरावात पूर्णपणे सहभागी झाला नसला तरी बुमरा संघाबरोबर होता. (India vs NZ, 3rd Test)
आता बुमराला डेंगी ताप आल्याचं समजतंय. पुण्यातच त्याला हा त्रास सुरू झाला होता. भारतीय संघात बुमरा ऐवजी सिराज हा एकमेव बदल झाला आहे. तर न्यूझीलंड संघात टीम साऊदी आणि मिचेल सँटनर यांच्या जागी मॅट हेनरिक आणि ईश सोधी यांची निवड झाली आहे. (India vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा- LPG Cylinder : ऐन दिवाळीत गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन किंमत)
भारत वि. न्यूझीलंड तिसरी कसोटी – भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराझ खान, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज व आकाशदीप सिंग
न्यूझीलंड संघ – टॉम लिथम, डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, मॅट हेन्री, एझाज पटेल, विल्यम ओरुर्क
हेही पहा-
Join Our WhatsApp Community